IPL Auction 2025 Live

Friendship Day 2019 च्या पूर्वसंध्येला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा; पहा फोटो

पहा त्यांचा खास फोटो...

Sachin Tendulkar & Vinod Kambli (Photo Credits: Twitter)

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे (Friendship Day). उद्या 4 ऑगस्ट रोजी जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल. यारी दोस्तीच्या या दिनानिमित्त प्रत्येकाच्या मनातील मैत्रीची भावना उफाळून येते. मैत्रीच्या जुन्या आठवणी ताज्या होऊ लागतात. क्रिकेट विश्वातीली मित्रांची अशीच एक जोडी म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि त्याचा बालमित्र, क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli). क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्याकडे दोघांनीही क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून असलेल्या त्यांच्या या मैत्रीत अनेक चढ-उतार आले असतील. मात्र यश, पैसा, प्रसिद्धी काहीही त्यांच्या मैत्रीच्या आड आले नाही. आज मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला खुद्द सचिन तेंडुलकर याने विनोदसोबतचा त्याचा लहानपणीचा क्रिकेट मैदानावरील फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. ICC ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश झाल्याबद्दल विनोद कांबळीने हटके स्टाईल मध्ये दिल्या सचिन तेंडुलकरला शुभेच्छा, पहा (Video)

सचिनने शेअर केलेल्या फोटोत सचिन, विनोद कांबळी याच्या खांद्यावर हात ठेऊन उभा आहे. हा फोटो शेअर करत सचिनने लिहिले की, "कांबळ्या, मला आपल्या शाळेच्या दिवसातील हा फोटो मिळाला आणि सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मग मनात फोटो शेअर करण्याचा विचार आला."

सचिनच्या या ट्विटला उत्तर देताना विनोद कांबळी याने लिहिले की, "या फोटोने आठवणी ताज्या झाल्या, मास्टर! तुला आठवतंय... यावेळेस जेव्हा आपण बॅटींग करत होतो तेव्हा एक पतंग पिचवर येऊन पडला. मग मी पतंग उचलून तो उडवू लागलो. त्यानंतर आचरेकर सर आपल्याकडे येऊ लागले. तु ते पाहिलेस पण मला सांगितले नाहीस आणि मग काय झाले हे आपल्या दोघांनाही ठाऊक आहे." सचिन तेंडुलकरने हटके स्टाईलमध्ये दिल्या बालमित्र विनोद कांबळी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! (Photo)

Tweet:

काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर-विनोद कांबळी यांच्यातील भांडण जगासमोर आले होते. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सचिनने आपल्याला कोणतीही मदत न केल्याचे कांबळी याने सांगितले होते. तर 2013 मध्ये निवृत्ती घेताना दिलेल्या भाषणात सचिनने विनोद कांबळीचा उल्लेखही केला नव्हता. मात्र 2017 मध्ये दोघेही आपापसातील भांडणे विसरुन पुन्हा एकत्र आले.