SA vs AUS: टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकी संघ जाहीर; कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डु प्लेसिसची टीममध्ये एंट्री

बॉल टेम्परिंगच्या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. फाफ डु प्लेसीस आणि कगिसो रबाडा यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी बोलावण्यात आले आहे.

फाफ डु प्लेसिस (Photo Credits: Getty Images)

दक्षिण आफ्रिका (South Africa) क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 संघासाठी घोषणा केली आहे. बॉल टेम्परिंगच्या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. फाफ डु प्लेसीस (Faf du Plessis) आणि कगिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी बोलावण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकामधील मालिका शुक्रवारी (21 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. मालिकेचा पहिला सामना जोहान्सबर्गमधील द वँडरर्स स्टेडियमवर खेळला जाईल. टी-20 मालिकेनंतर दोन्ही देशांत 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाईल. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत झालेल्या पराभवानंतर डु प्लेसिसने टेस्ट आणि टी-20च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. दुसरीकडे, राबाडा इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. (भारत दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिका टीमला मोठा झटका, फाफ डु प्लेसिसने कसोटी आणि टी -20 संघाच्या कर्णधारपदाचा दिला राजीनामा)

2016 मध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार पदाची जबाबदारी डु प्लेसिसला देण्यात आली होतो. दुखापतीमुळे बर्‍याच दिवस संघातून बाहेर राहिल्यानंतर डिव्हिलियर्सच्या जागी त्याला कर्णधारपद देण्यात आले होते. आफ्रिकेच्या 16 सदस्यीय संघात एनरिच नॉर्टजेचादेखील समावेश आहे. फॉर्ममध्ये सलामी फलंदाज टेंबा बावुमाला सामील केले असले तरीही त्याला प्रथम आपली फिटनेस सिद्ध करावी लागेल. रविवारी इंग्लंडविरुद्ध बामूला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. रीजा हेंड्रिक्स, बुरेन हेंड्रिक्स आणि सिसंदा मॅगाला यांना 16 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले नाही. रेजा हेन्ड्रिक्स, बेउरन हेन्ड्रिक्स आणि सिसंदा मॅगाला यांना देखील 16 सदस्यीय टीममध्ये स्थान मिळाले आहेत.

दक्षिण आफ्रिकी टीमः

क्विंटन डी कॉक (कॅप्टन, विकेटकीपर), टेंबा बावुमा, फाफ डु प्लेसिस, बोर्न फोर्टुइन, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिच नॉर्टजे, एंडिल फेहलुकवाओ, ड्वाइन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स, डेल स्टेन, पिटे वैन बिलजन, रासी वैन डर डूसन.