SA vs AUS 1st T20I Live Streaming: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony SIX वर

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर बंदी संपल्यानंतर पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका खेळण्यासाठी येत आहेत. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी वर उपलब्ध असेल. सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव वर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 3 टी -20 मालिका 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 मालिका गमावून या मालिकेत येत आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने अखेरच्या टी-20 मालिकेत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) बंदी संपल्यानंतर पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका खेळण्यासाठी येत आहेत. बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या तब्बल दोन वर्षानंतर दोघे पहिल्यांदा आफ्रिकी दौऱ्यावर असणार आहेत. या दोघांकडूनही उत्तम कामगिरीची अपेक्षा केली जाईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसमोर असे आव्हान इतके सोपे होणार नाही. ऑस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेल ची कमतरता भासवेल, पण ते विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करतील. (SA vs AUS 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा आऊट, जाणून घ्या कारण)

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील सामना वँडरर्स स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी वर उपलब्ध असेल. सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव वर पाहायला मिळेल.

अलीकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कामगिरी खूपच खराब झाली असून ऑस्ट्रेलियाची टीम खूप मजबूत आहे. याच कारणास्तव ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या टी-20 सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार असणार आहे. शिवाय, दुखापतीमुळे टेंबा बावुमा ला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्ध त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.

असा आहे दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया संघ

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन, विकेटकीपर), टेंबा बावुमा, फाफ डु प्लेसिस, बोर्न फोर्टुइन, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिच नॉर्टजे, एंडिल फेहलुकवाओ, ड्वाइन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स, डेल स्टेन, पिटे वैन बिलजन, रासी वैन डर डूसन.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी (उपकर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), मिशेल मार्श, डार्सी शॉर्ट, झए रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, एडम ज़म्पा.