RR vs KKR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सची हॅटट्रिक हुकली! KKRने 37 धावांनी विजय मिळवत रॉयल्सचा चारली पहिल्या पराभवाची चव
आयपीएलच्या 12व्या सामन्यात 175 धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट रायडर्सने 37 धावांनी दारुण पराभव केला. कोलकाताने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थानला धावांपर्यंतच मजल मारता आली. यामुळे, त्यांना पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानचा तीन सामन्यातील हा पहिला पपराभव ठरला, तर कोलकाताचा हा दुसरा विजय होता.
आयपीएलच्या (IPL) 12व्या सामन्यात 175 धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 37 धावांनी दारुण पराभव केला. कोलकाताने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थानला धावांपर्यंतच मजल मारता आली. यामुळे, त्यांना पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानचा तीन सामन्यातील हा पहिला पपराभव ठरला, तर कोलकाताचा हा दुसरा विजय होता. राजस्थानने आज फलंदाजीने निराशाजनक कामगिरी केली. राजस्थानकडून कोलकाताने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात सलामी फलंदाज टॉम कुरन (Tom Curran) 54, जोस बटलरने (Jos Buttler) 21 धावा केली, अन्य आघाडीचे आणि मधल्याफळीचे फलंदाज दुहेरी आकड्याला स्पर्श करू शकले नाही. दुसरीकडे, केकेआरच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना राजस्थानला अडचणीत ठाकले. शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी यांनी प्रत्येकी 2, पॅट कमिन्स, सुनील नारायण आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2020: रॉबिन उथप्पाने केले BCCI नियमाचे उल्लंघन, KKR विरुद्ध सामन्यात बॉलवर लावली लाळ Watch Video)
आजच्या सामन्यात रॉयल्सने फलंदाजीने केकेआरसमोर गुढघे टेकले. राजस्थानची सुरुवात खराब ठरली. कमिन्सने पहिले कर्णधार स्टिव्ह स्मिथला बाद करून टीमला मोठे यश मिळवून दिले. राजस्थानचे तब्बल सहा खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले. राजस्थानकडून टॉम कुरनने सर्वाधिक धावा केल्या, बटलर 21, तर मागील सामन्यात राजस्थानच्या विजयाचा नायक ठरलेला राहुल तेवतिया आज प्रभावी कामगिरी करून शकला नाही आणि धावांवर माघारी परतला. दरम्यान, राजस्थानविरुद्ध आजच्या विजयासह कोलकाता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे, तर राजस्थानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
दुसरीकडे, सामन्यात टॉस गमावून पहिले करणाऱ्या कोलकाताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे राहिली नसली तरी अखेरीस इयन मॉर्गनच्या फटकेबाजीने त्यांना आव्हानात्मक धावसंख्येकडे नेले. सलामी फलंदाज शुभमन गिलने सर्वाधिक 47 धावा केल्या, मॉर्गन 34, आंद्रे रसेल 24 आणि नितीश राणाने 22 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 2 विकेट घेतल्या. अंकित राजपूत, जयदेव उनाडकट आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)