RR vs DC, IPL 2020: शिखर धवन पुन्हा अपयशी, RR विरुद्ध अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याने संतप्त नेटकऱ्यांनी दिल्ली व्यवस्थापनावर व्यक्त केली नाराजी

राजस्थानच्या गोलंदाजांना पहिली विकेट मिळवण्यासाठी जास्त वेळ लागला नाही आणि जोफ्रा आर्चरने दुसर्‍या ओव्हरमध्ये शिखर धवनला केवळ 5 धावांवर बाद केले. पुन्हा एकदा कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे धवनच्या फॉर्मची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

शिखर धवन, अजिंक्य रहाणे (Photo Credit: Instagram)

RR vs DC, IPL 2020: इंडियान प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 23व्या सामन्यात राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात शारजाह येथे लढत सुरु आहे. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून दिल्लीला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2020 गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी सलामीला येत दिल्लीसाठी सुरुवात केली. तथापि, राजस्थानच्या गोलंदाजांना पहिली विकेट मिळवण्यासाठी जास्त वेळ लागला नाही आणि जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) दुसर्‍या ओव्हरमध्ये धवनला केवळ 5 धावांवर बाद केले. आर्चरच्या चेंडूवर धवनने फटका मारला जो सरळ यशस्वी जयस्वालच्या हातात गेला. पुन्हा एकदा कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे धवनच्या फॉर्मची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (RR vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सची अती घाई! जोफ्रा आर्चरने घेतल्या 3 विकेट, DCचे विजयासाठी रॉयल्ससमोर 185 धावांचे आव्हान)

34 वर्षीय धवनचा खराब फॉर्म सुरु असल्याने दिल्ली अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देईल अशी चाहत्यांची आधीच अपेक्षा होती. तथापि, धवनला दिल्लीने पुन्हा संधी दिली आणि फलंदाजाने अत्यंत निराशा केली. राजस्थानविरुद्ध दिल्ली सामन्यात धवन पुन्हा एकदा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्यानंतर नेटिझन्सनी ट्विटरवर वारंवार नापास झाल्यानंतरही धवनबरोबर टिकून राहिल्याबद्दल दिल्ली व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. चाहत्यांनी दिल्लीला रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यास सांगितले. काही चाहत्यांनी दिल्ली व्यवस्थापनाला रहाणेला आयपीएलच्या मिड-सीजन ट्रांसफर दरम्यान अन्य काही संघात पाठवण्याचे आवाहन केले. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

धवन रहाणेला जास्त काळ ठेवू शकणार नाही 

रहाणे 50 धावा करेल

डीसीने रहाणेला देऊन टाकलं पाहिजे ..

रहाणेला संधी द्या

धवनला आराम द्या

20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 184 धावा केल्या आणि रॉयल्ससमोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष ठेवले. दिल्लीकडून शिमरॉन हेटमायरने 45 धावा केल्या, मार्कस स्टोइनीस 39 आणि कर्णधार श्रेयस अय्यर 29 धावांचे योगदान दिले. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.