RCB फलंदाज दिनेश कार्तिक गायले पाकिस्तानच्या धुरंदर फलंदाजाचे गुणगान, कौतुकात ‘ही’ मोठी गोष्ट बोलली

तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने आपल्या सातत्याने क्रिकेट जगताला प्रभावित केले आहे. अनुभवी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने आजमने आपल्या फलंदाजीत उशिरा केलेल्या दोन बदलांवर प्रकाश टाकला.

दिनेश कार्तिक (Photo Credit: PTI)

Dinesh Karthik Praises Babar Azam: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आयपीएल (IPL) 2022 मध्ये त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघातही (Indian Team) स्थान मिळवले आहे. या मोसमात त्याने आरसीबीसाठी (RCB) फिनिशर म्हणून अप्रतिम भूमिका बजावली आणि अनेक सामन्यांमध्ये संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता दिनेश कार्तिकने पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) कर्णधार बाबर आजमवर (Babar Azam) कौतुकाचा वर्षाव केला आहे. बाबर आणखी चांगला होत राहील आणि वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्यास सज्ज होईल असेही भारताच्या यष्टिरक्षकाने म्हटले. (IPL 2022: क्वालिफायर 2 पूर्वी RCB ला धक्का, स्टार फलंदाजाला BCCI ने फटकारले)

कार्तिक म्हणाला की, "बाबर आजममध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज बनण्याची क्षमता शंभर टक्के आहे. तो एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे जो त्याच्या फलंदाजीच्या शिखरावर आहे." लक्षात घ्यायचे की बाबर आजम सध्या टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आयसीसी रँकिंगमध्ये नंबर वन फलंदाज आहे तसेच टेस्ट फॉरमॅटमध्ये तो जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बाबर आजम क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनणारा जगातील पहिला खेळाडू बनून इतिहास रचू शकतो, अ विश्वास कार्तिकला वाटतो. आयसीसी रिव्ह्यूमध्ये दिनेश कार्तिकने या गोष्टी सांगितल्या.

कार्तिक म्हणाला की “बाबर खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार आहे आणि त्याने वेगवेगळ्या क्रमाने चांगली फलंदाजी केली आहे. मला वाटते त्यांच्यात क्षमता आहे. त्याने पाकिस्तान संघातील खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आणि देशासाठी विशेष गोष्टी करण्याची प्रेरणा दिली आहे.” कार्तिक म्हणाला की, “जेव्हा मी त्याला फलंदाजी करताना पाहतो तेव्हा त्याच्या दोन गोष्टी मला सर्वात जास्त प्रभावित करतात ज्यात पहिला त्याचा तोल आणि दुसरा त्याचा स्ट्राइकिंग पॉइंट. बॅकफूट असो किंवा फ्रंट फूट, बॉल मारण्याची त्याची क्षमता खूपच प्रभावी आहे.” बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याच्या बॅटने आणि नेतृत्वानेही पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याने आतापर्यंत आपल्या देशासाठी 40 कसोटी, 86 एकदिवसीय आणि 74 टी-20 सामने खेळले असून त्याने सर्वोच्च पातळीवर सुमारे 9800 धावा केल्या आहेत.