Rohit Sharma's Captaincy: उंपात्य फेरीत पराभवानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात, हार्दिक पांड्याकडे दिले जावू शकते टी-20 चे कमान
तसेच त्याचे कर्णधारपदही धोक्यात येवू शकते. रोहित शर्माला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर देखील ट्रोल केलं जात आहे.
गुरूवारी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वावर अनेक प्रश्न देखील उभे राहत आहे. तसेच त्याचे कर्णधारपदही धोक्यात येवू शकते. रोहित शर्माला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर देखील ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे भारतीय संघाचे कर्णधारपद युवा खेळाडूंना द्यावे असा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडला (New Zealand) जाणार आहेत. तर या पैकी काही वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हार्दिक पांड्याकडे न्युझीलंड टी-20 सामन्याचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
T20 विश्वचषक गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, फिरकीपटू आर अश्विन, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मायदेशी परतणार आहेत. यापैकी दिनेश कार्तिक आणि आर अश्विन यांची आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड होणार नाही. इतकंच नाही तर टीम इंडियाचा संपूर्ण कोचिंग स्टाफही बदलला जाणार आहे, कारण त्यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण अँड कंपनी न्यूझीलंडला जाणार आहे.
3 सामन्यांची T20I मालिका
टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 3 सामन्यांची T20I मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळवला जाईल, तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 25 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होईल. (हे देखील वाचा: Indian Seniors To Be Out Of T20 Format: भारतीय संघात पुढील काही महिन्यात होवू शकतात मोठे बदल, या वरिष्ठ खेळाडूंना दाखवला जावू शकतो बाहेरचा रस्ता)
न्यूझीलंड T20I मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.