Rohit Sharma येत्या 11 डिसेंबर करिता वजन कमी करण्यासाठी NCA मध्ये घेतोय विशेष मेहनत
त्यावेळी आपले वडिल आजारी असून त्यांच्या देखभालीसाठी आपण ऑस्ट्रेलिया दौ-यावर येऊ शकला नाही. असेही त्याने सांगितले.
भारतीय क्रिकेट टीम (India Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलिया दौ-यावर आहे. मात्र या दौ-यात भारतीय टीमचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) नसल्याने त्याचे तमाम चाहते त्याला खूप मिस करत आहेत. खरे पाहता आधीच्या सामन्यांदरम्यान त्याला झालेल्या दुखापतींमुळे तो या दौ-यात सहभागी होऊ शकला नाही. याचे चाहत्यांइतकेच रोहित शर्मालाही खूप वाईट वाटत आहे. यासाठी रोहित शर्मा स्वत:वर विशेष मेहनत घेत आहे. त्यासाठी तो NCA मध्ये आपले वजन कमी करण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. यााधी रोहित शर्मा IPL खेळण्यासाठी आला होता तेव्हा प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यावेळी आपले वडिल आजारी असून त्यांच्या देखभालीसाठी आपण ऑस्ट्रेलिया दौ-यावर येऊ शकला नाही. असेही त्याने सांगितले.
मात्र आता बातमी समोर येत आहे की, रोहित शर्माने केवळ आपल्या झालेल्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. टीम इंडियामधील आपले स्थान कायम राहण्यासाठी रोहित शर्मा विशेष मेहनत घेत आहे. त्यासाठी तो आपले वजन कमी करत आहे. येत्या 11 डिसेंबरला रोहितला पुढील सामन्यात घ्यायचे की नाही याबाबत विचार केला जाईल.हेदेखील वाचा- IND Vs AUS 2nd T20I 2020: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली याने लगावलेला षटकार पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; पाहा व्हिडिओ
सध्या रोहित NCA मध्ये आपले वजन घटविण्यावर भर देत आहे. ज्यामुळे भविष्यात अशा दुखापतींपासून त्याचा बचाव होईल आणि टीम इंडियामध्ये खूप काळ टिकून राहिल.
सामन्यांदरम्यान दुखापत झाल्याकारणाने इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाच्या चार सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये पूर्णपणे बाहेर झाला आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा पुढील सामन्यांसाठी फिट आहे की नाही हे 11 डिसेंबरला पाहिले जाईल. तेव्हाच ठरेल की तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच खेळणार की नाही. रोहितचे चाहते या निर्णयाची वाट पाहात आहेत.