कीरोन पोलार्ड याने रोहित शर्मा याला ट्विटरवर केले अनफॉलो, 'हिटमॅन'च्या अनफ्रेंडशिप डेच्या Tweet ने Netizens चा उडाला गोंधळ
इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सकडून वर्षानुवर्षे खेळत असलेले किरोन पोलार्डने रोहितला सोशल मीडिया साईट ट्विटरवर अनफॉलो केले आहे. याच्यानंतर रोहितने पोलार्डसह मैत्री तुटल्याबद्दल एक रंजक ट्विट केले आहे. दोन्ही खेळाडूंमधील अचानक आलेला दुरावापाहून नेटिझन्सही गोंधळले, पण आगामी भारत दौर्यापूर्वीचीही मोहीम असल्याचे कळताच यूजर्सही हसू लागले.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सकडून वर्षानुवर्षे खेळत असलेले क्रिकेट विश्वातले दोन सर्वात लोकप्रिय खेळाडू किरोन पोलार्ड (Kieron Pollard) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील मैत्रीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 2011 पासून दोन्ही खेळाडू मुंबई कडून आयपीएल खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौर्याच्या वेळी एकमेकांच्या घरी जाण्यापासून मुंबईच्या डगआऊटमध्ये आठ वर्षे ट्रेनिंग करण्यापर्यंत रोहित आणि पोलार्ड यांच्यात विशेष बंध तयार झले आहेत. हे दोन्ही खेळाडू एका संघात खेळल्यामुळे वेगवेगळ्या देशांमधील असूनही खूप चांगले मित्र आहेत. पण दोंघाच्या या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली आहे असे दिसतेय. काही दिवसानंतर वेस्ट इंडिज संघ मर्यादित षटकारांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यापूर्वी पोलार्डने रोहितला सोशल मीडिया साईट ट्विटरवर अनफॉलो केले आहे. याच्यानंतर रोहितने पोलार्डसह मैत्री तुटल्याबद्दल एक रंजक ट्विट केले आहे. (IND vs BAN Day/Night Test: विराट कोहली याच्याकडे विश्वविक्रम नोंदवण्याची संधी, कोणताही भारतीय कर्णधार नाही करू शकला 'ही' कामगिरी)
रोहितने पोलार्डसह मैत्री तोडल्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे आणि सोबत एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यात रोहित आणि पोलार्ड कारमध्ये जात असताना, गाडी अचानक बंद पडल्याने रोहित पॉलीला ढकलण्यास सांगतो आणि रोहित अचानक गाडी चालू करतो आणि पॉलीचे सामना बाहेर सामान टाकून निघून जातो. हा व्हिडिओ खूप मनोरंजक आहे. दरम्यान, पोलार्डने रोहितला अनफॉलो केल्याच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. दोंघामध्ये नक्की काय बिनसलंय हे जाणून घेण्याचा चाहते प्रयत्न करत होते. दोन्ही खेळाडूंमधील अचानक आलेला दुरावापाहून नेटिझन्सही गोंधळले, पण विंडीजच्या आगामी भारत दौर्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सचीही मोहीम असल्याचे कळताच यूजर्सही हसू लागले.
आणि पॉलीने अश्याप्रकारे दिला प्रतिसाद
पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
मनोरंजक
नेमकी बाब काय आहे, प्रत्येकाला त्याचे कारण जाणून घ्यायचे आहे
अहो हे प्रसिद्धीसारखे दिसते
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघात 6 डिसेंबरपासून मर्यादित षटकारांची मालिका खेळण्यात येणार आहे. दोन संघांदरम्यान 3 सामन्यांची टी-20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेदरम्यान, किरोन पोलार्ड विंडीजचे नेतृत्व करणार आहे. अशा परिस्थितीत पोलार्ड आणि रोहितमधील मैत्री काही काळ तुटली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)