Rohit Sharma Top Sixes: रोहित शर्मा आहे सिक्सर किंग, टीम इंडियाच्या 'हिटमॅन'ने ठोकलेले हे षटकार देतात कबुली, पहा Video

रोहितने आपल्या करिअरमध्ये आजवर मारलेले 10 असे षटकार आज आपण पाहणार आहोत जे 'हिटमॅन' नक्कीच अविस्मरणीय असेल.

रोहित शर्मा (Photo by Alex Davidson/Getty Images)

Rohit Sharma Top Sixes: षटकार मारण्याची एक कला आहे आणि कलेच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे यामध्ये काही इतरांपेक्षा चांगले ठरतात. आणि टीम इंडियाचा (Team India) 'हिटमॅन' याबाबतीत अगदी लकी आहे. भारतीय संघाच्या (Indian Team) मर्यादित ओव्हरचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या बॅट आणि नेतृत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोहितने जगभरातील अनेक क्रिकेट मैदानावर संस्मरणीय खेळी केली आहे. रोहित आज मॉडर्न डे क्रिकेटचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. षटकार ठोकण्याची आणि गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा त्याच्या क्षमतेने त्याला आज 'हिटमॅन' अशी ओळख मिळवून दिली आहे. रोहित मर्यादित ओव्हर क्रिकेटमधील भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. शिवाय, भारताच्या स्थानी टी-20 इंडियन प्रीमियर लीगमधेही रोहितच्या बॅटिंग आणि नेतृत्वाची झलक पाहायला मिळाली आहे. रोहित आणि षटकारांचा फार जुना संबंध आहे. हे त्याचे शुद्ध कौशल्य आहे जे त्याला मोठे फटके खेळण्यास मदत करतात. रोहितने आपल्या कारकिर्दीत आजवर अनेक संस्मरणीय षटकार ठोकले आहेत. (Rohit Sharma आणि पत्नी Ritika Sajdeh चेन्नई हॉटेलमध्ये क्वारंटाइन, हिटमॅनने शेअर केला Quaran-Team फोटो, पहा)

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज यांच्यासारख्या देशांच्या अनुभवी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रत्येक गोलंदाजांवर रोहितने बॅटने वर्चस्व गाजवले. अशास्थित रोहित मर्यदित ओव्हरमध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे यात शंका नाही. क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय फलंदाजांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत रोहित मनाचे तिसरे स्थान पटकावले आहे. रोहितने आजवर 425 षटकार ठोकले आहेत. रोहितच्या पुढे पाकिस्तानी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी आहे ज्याने 476 सिक्स मारले आहेत. रोहितने आपल्या करिअरमध्ये आजवर मारलेले 10 असे षटकार आज आपण पाहणार आहोत जे 'हिटमॅन' नक्कीच अविस्मरणीय असेल.

रोहितने आयपीएलमध्ये खेळताना 213 षटकार मारले असून यादीत तो क्रिस गेलं, सुरेश रैना आणि एमएस धोनी यांच्यानंतर चौथ्या स्थानावर आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी-20) एकूण 425 षटकार खेचले आहेत. विशेष म्हणजे रोहितने वनडे क्रिकेटमध्ये आपल्या तिसऱ्या द्विशतकी खेळात श्रीलंकाविरुद्ध केवळ चौकार व षटकारांच्या मदतीने 124 धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाचा सलामी फलंदाज मागील तीन वर्षापासून 2017, 2018 आणि 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे. या तीनही वर्षात रोहितने पन्नासहून अधिक षटकार खेचले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif