रोहित शर्मा याने All-Time 5 पसंतीच्या भारतीय फलंदाजांचा केला खुलासा, भारताच्या सुवर्ण काळातील दिग्गज क्रिकेटर्सचा केला समावेश

या दरम्यान दोघांनी बर्‍याच गोष्टींवर चर्चा केली. सध्याच्या भारतीय सलामी फलंदाजाने आपले पाच आलं-टाइम आवडते भारतीय फलंदाज निवडले. रोहितने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुलीला आपल्या यादीत समावेश केला.

रोहित शर्मा (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांत संपूर्ण जगाची परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. कोणतेही खेळ होत नसल्यामुळे क्रिकेटपटूंसह क्रीडापटूंना क्वारंटाइनचा वेळ सोशल मीडियावर घालविण्याशिवाय पर्याय उरला नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह अनेक नामांकित क्रिकेटपटूंनी इन्स्टाग्राम लाइव्ह आणि ट्विटर प्रश्न-उत्तर सत्रांचा सहारा घेतला आहे. टीम इंडियाचा सलामी फलंदाज सध्या सोशल मीडियावर बर्‍यापैकी सक्रिय आहे आणि इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटूंशी संवाद साधत आहे. लॉकडाउन दरम्यान रोहितने केविन पीटरसन, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह अशा अनेक क्रिकेटपटूंशी संवाद साधला आहे. नुकतंच त्याने मुंबई इंडियाचा माजी सहकार हरभजन सिंहबरोबर (Harbhajan Singh) लाईव्ह चॅट सत्र आयोजित केलं. या दरम्यान दोघांनी बर्‍याच गोष्टींवर चर्चा केली. दशकभराच्या कारकीर्दीत रोहितने ड्रेसिंग रूम अनेक भारतीय दिग्गजांबरोबर शेअर केला आहे. (रोहित शर्मा, हरभजन सिंह यांचे लाईव्ह चॅट, Ye Chinese Logo Ne Kya Kar Diya Yaar! म्हणत चीनवर निशाणा; पाहा Funny Video)

सध्याच्या भारतीय सलामी फलंदाजाने आपले पाच आलं-टाइम आवडते भारतीय फलंदाज निवडले. रोहितने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुलीला आपल्या यादीत समावेश केला. या पाचही क्रिकेटर्सनी भारतीय क्रिकेट घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जेव्हा हे पाच फलंदाज राष्ट्रीय जर्सीत असतानाच काळ सुवर्णकाळ मानला जायचा. कसोटी असो वा वनडे, या पाच क्रिकेटर्सनी प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी रोहितने एक व्हिडिओही शेअर केला होता ज्यात त्याने आपल्या क्वारंटाइन दिनक्रमाचे वर्णन केले होते. व्हिडिओमध्ये, मुंबईचा फलंदाज वर्कआउट करताना, आपल्या मुलीबरोबर वेळ घालवत, आणि पत्नीला स्वयंपाकघरात मदत करताना दिसला. रोहित मुंबई इंडियन्सची जर्सीत पुनरागमन करण्यास सज्ज होता, पण भारतात कोरोनाचा वाढता प्रसार होत असल्याने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. रोहित अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत झळकला होता, अखेरच्या सामन्यात दुखापतीनंतर त्याला वनडे आणि टेस्ट मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.