Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माने वादानंतर आपल्या दुखापतीवर दिले अपडेट, सांगितली संपूर्ण परिस्थिती

इंडियन प्रीमिअर लीगच्या लीग टप्प्यातील अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक दरम्यान चाहत्यांना मुंबई इंडियन्स संघात एक धक्कादायक बदल पाहायला मिळाला. मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा मैदानावर टॉससाठी आला आणि आपल्या दुखापतीबाबत विचारले असता आपण पूर्णपणे फिट असल्याने म्हणाला.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Rohit Sharma Injury Update: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) लीग टप्प्यातील अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) नाणेफेक दरम्यान चाहत्यांना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात एक धक्कादायक बदल पाहायला मिळाला. मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानावर टॉससाठी आला आणि आपल्या दुखापतीबाबत विचारले असता आपण पूर्णपणे फिट असल्याने म्हणाला. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या रोहितला आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरुन बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. याबद्दल बरेच वाद, चर्चा झाल्या आणि रोहितचा संघात समावेश केला नसल्याने दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिल्यांदा रोहितने आपल्या दुखापतीवर भाष्य केले आणि आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितच्या जागी मर्यादित ओव्हरमध्ये केएल राहुलला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. (Rohit Sharma Injury Update: रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे मोठे विधान)

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मागील सामन्यात टॉस दरम्यान रोहित म्हणाला, “संपूर्ण टूर्नामेंटमध्ये नाणेफेकविषयी बरीच अटकळ बांधली जात आहे. टॉसवर अधिक लक्ष केंद्रित करण्याऐवजी आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे. मला तंदुरुस्त वाटत आहे." दुसरीकडे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंगळवारी सकाळी रोहित अजूनही ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाऊ शकतो, पण त्याला फक्त त्याची फिटनेस सिद्ध करावी लागेल असे म्हटले. रोहितने हैदराबादविरुद्ध मॅचनंतर आपल्या दुखापतीविषयी बोलताना म्हटले, "परतल्याने मला खूप आनंद झाला आहे, थोडा वेळ लागला. आता मी येथून आणखी काही सामने खेळण्याची अपेक्षा करीत आहे, काय होते ते पाहूया. माझी दुखापत ठीक आहे.”

दरम्यान, हैदराबाद आणि मुंबई यांच्यात झालेल्या आयपीएल 13च्या अंतिम लीग सामन्यात डेविड वॉर्नरच्या टीमने 10 विकेटने जबरदस्त विजय मिळवला आणि यंदाच्या आयपीएल प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सुपर ओव्हर सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली त्यानंतर मुंबईच्या कर्णधाराला काही सामन्यांना मुकावे लागले. त्याच्या जागी किरोन पोलार्डने टीमचे नेतृत्व केले आणि संघासाठी विजय मिळवत प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केलं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now