IPL Auction 2025 Live

ICC Test Ranking: रोहित शर्माने 3 वर्षांनंतर टॉप-5 मध्ये केला प्रवेश, विराट आणि यशस्वीनेही रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप

रोहित शर्माशिवाय भारतीय संघाचे स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनाही खूप फायदा झाला आहे.

Rohit Sharma And Virat Kohli (Photo Credit - X)

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) आज साप्ताहिक क्रमवारी जाहीर केली. भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजीच्या (ICC Test Ranking) क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. रोहितने कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्माशिवाय भारतीय संघाचे स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनाही खूप फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या तीन खेळाडूंचा टॉप-10 मध्ये समावेश आहे.

3 वर्षांनंतर रोहितचा टॉप-5 मध्ये प्रवेश

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला 3 वर्षांनंतर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये स्थान मिळवता आले आहे. रोहित शर्माला फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2021 नंतर प्रथमच रोहित शर्मा आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. रोहित शानदार फॉर्ममध्ये आहे जर बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत हिटमॅनच्या बॅटने चांगली कामगिरी केली तर तो क्रमवारीत आणखी मोठी झेप घेऊ शकतो.

विराट आणि यशस्वीलाही झाला फायदा

रोहित शर्मा व्यतिरिक्त भारताचा महान फलंदाज आणि चाहत्यांचा आवडता विराट कोहलीनेही कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत प्रगती केली आहे. विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. विराटशिवाय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाललाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचे तीन खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्व जैस्वाल हे टॉप-10 मध्ये आहेत.

आयसीसी क्रमवारीत अव्वल 10 फलंदाज

जो रूट (इंग्लंड) – 899 गुण

केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 859 गुण

डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) – 768 गुण

स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – 757 गुण

रोहित शर्मा (भारत) – 751 गुण

यशस्वी जैस्वाल (भारत) – 740 गुण

विराट कोहली (भारत) – 737 गुण

उस्मान ख्वाज (ऑस्ट्रेलिया) – 728 गुण

मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) – 720 गुण

मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया) – 720 गुण