Rohit Sharma in Ahmednagar: 'विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या जीवात जीव आला'; अहमदनगरमध्ये रोहित शर्माची मराठीत फटकेबाजी

त्यावेळ रोहित शर्माची मराठीने सर्वाची मने जिंकली. क्रिकेट अकादमी आणि स्टेडियमच्या भूमिपूजनासाठी राशीन येथे आला होता.

Photo Credit-X

Rohit Sharma: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात क्रिकेट किंग्डम अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) हा राशीन येथे आला होता. राशीनमध्ये असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत वरील दोन्ही गोष्टीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठीत भाषण करत असताना रोहित शर्माने (Rohit Sharma in Ahmednagar)चाहत्यांची मनं जिंकली. (हेही वाचा: Bangladesh Women vs Scotland Women, 2024 ICC Women’s T20 World Cup 1st Match Live Playing XI Update: स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात बांगलादेश 'या' दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरेल; दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर नजर टाका)

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला, मी राशीनमध्ये आलो, याचा आनंद वाटतोय. मागच्या तीन महिन्यात आमच्या आयुष्यात बरंच काही झालं. टी-2० विश्वचषक जिंकणं, हे आमचं ध्येय होतं. विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. क्रिकेट हा खेळ सर्वांना आवडतो. राशीनमध्ये आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करत आहोत आणि मला खात्री आहे की, पुढचे यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल हे इकडूनच येणार.

आमदार रोहित पवार यांनी यावेळी रोहित शर्माला काही प्रश्न विचारले. राशीनमध्ये श्री माता अंबाबाईचे मंदिर आहे. या मंदिरात दर्शन घेऊन आणि ग्रामीण भाग पाहून कसं वाटलं? असा प्रश्न विचारला असता रोहित शर्मा म्हणाला की, मला पवित्र वाटत आहे. मी गाडीमधून येत असताना मला इकडचा ग्रामीण भाग पाहून आनंद वाटला. या क्रिकेट अकदामीच्या माध्यमातून मी इथे पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहे.

तसेच भारताला आणखी एक विश्वचषक हवा आहे आणि विश्वचषक जिंकणारा कर्णधार रोहित शर्माच असायला हवा, अशी इच्छा रोहित पवार यांनी व्यक्त केली.