Wimbledon 2019: विंबलडनमध्ये रॉजर फेडरर याची शंभरी, 100 वी मॅच जिंकत लिहिला इतिहास; 10 वर्षांनी सेमीफायनलमध्ये राफेल नदाल शी सामना
क्वार्टर फाइनलमधील आपल्या या विजयाबरोबर फेडरर आणि राफेल नदाल पुन्हा एकदा विंबलडनच्या सेमीफायनलमध्ये आमने-सामने येण्यास सज्ज झाले आहेत.
स्वित्झर्लंडचा (Switzerland) महान टेनिसपटू रॉजर फेडरर (Roger Federer) याने बुधवारी विंबलडन (Wimbledon) मध्ये 100 वा विजय नोंदवायला. जपानच्या केई निशिकोरी (Kei Nishikori) याला क्वार्टर फाइनलमध्ये 4-6, 6-1, 6-4, 6-4 पराभूत करत फेडररने विंबलडनमध्ये 100व्या विजयाची नोंद केली. विंबलडनमध्ये 100 सामने जिंकणारा फेडरर हा ओपन-इरा मधील पहिला टेनिसपटू आहे. क्वार्टर फाइनलमधील आपल्या या विजयाबरोबर फेडरर आणि राफेल नदाल (Rafael Nadal) पुन्हा एकदा विंबलडनच्या सेमीफायनलमध्ये आमने-सामने येण्यास सज्ज झाले आहेत.
टेनिस जगतातील दोन सर्वाधिक यशस्वी खेळाडू, फेडरर व नदाल, कारकिर्दीत 40 व्यांदा आमने-सामने येणार आहे. याआधी फेडरर आणि नदाल फ्रेंच ओपन (French Open) च्या सेमीफाइनलमध्ये भिडले होते. दरम्यान, फेडरर आणि नदाल याआधी 2008 नंतर प्रथमच विंबलडनमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. नदालने 2008 मध्ये फेडररचा अंतिम लढतीत पराभव केला होता. ही लढत विंबलडनच्या इतिहासातील सर्वांत शानदार अंतिम लढत मानली जाते. सेमीफाइनलमध्ये फेडररचा सामना करण्यासाठी नदाल यांनी अमेरिकेच्या सॅम क्वेरी याला सलग सेट्समध्ये पराभूत केले.
दुसरीकडे, महिला एकेरीच्या सेमीफायनल बद्दल बोलले तर, अमेरिकेची दिग्गज सेरेना विलियम्स (Serena Williams) ने सेमीफायनल गाठताना आपल्याच देशाच्या एलिसन रिस्के (Alison Riske) चे कडवे आव्हान 6-4, 4-6, 6-3 असे मोडून काढले. दुसरीकडे रोमानियाच्या सातव्या मानांकीत सिमोना हेलप (Simona Halep) नेही सेमीफायनल गाठताना चीनच्या झांग शुई (Zhang Shuai) हिच्याविरुद्ध 7-6(7-4), 6-1 अशी बाजी मारली.