Rishabh Pant चं X अकाऊंट हॅक? 'Neeraj Chopra पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकला तर...' पोस्ट वरून चर्चा!

यंदा पॅरिसच्या ऑलिम्पिक मध्ये 11 ऑगस्ट पर्यंत इव्हेंट्स आहेत

Neeraj Chopra and Pant | X @SelflessRohit

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोपडा (Neeraj Chopra) याने पॅरिस च्या ऑलिंपिक मध्ये पुन्हा सुवर्णपदकाच्या कमाईची आशा पल्लवित केली आहे. यावरूनच भारतीय क्रिकेट टीम च्या रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या X वरील पोस्ट वरून त्याचं अकाऊंट हॅक झालं आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पंत च्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या ट्वीटला सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट्स देणार्‍या भाग्यवान विजेत्याला 100089 रूपये देणार असल्याचं म्हटलं आहे. अन्य दहा अव्वल युजर्सना विमानाची तिकीटं देणार असल्याचं म्हटलं आहे. क्रिकेटर कडून अशाप्रकारचं ट्वीट याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  (हेही वाचा - Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी ठरला पात्र)

काल झालेल्या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये नीरजने टोकियो ऑलिंपिक च्या सुवर्णपदक कमाईचा 89.34 मीटर लांब भाला फेकत आपलं स्थानं पक्क केलं आहे. दरम्यान त्याचा हा यंदाच्या कारकीर्दीमधील सर्वोत्तम प्रयत्न आहे. पॅरिस ऑलिंपिक मध्ये अद्याप भारताने सुवर्णपदकाची कमाई केलेली नाही. सध्या मनू भाकर कडे 2 कांस्य आणि स्वप्नील कुसळे कडे एक कांस्य पदक आहे. विनेश फोगट कडून किमान रौप्य पदक पक्क झालं आहे. Paris Olympics 2024: नीरज चोप्रा आता पुन्हा सुवर्ण पदकासाठी लढणार; पाहा केव्हा,कधी अन् किती वाजता सुरु होणार सामना? 

रिषभ पंतची पोस्ट

नीरज चोपडा याचा इव्हेंट पॅरिसच्या ऑलिम्पिक मध्ये 8 ऑगस्ट दिवशी आहे. यंदा पॅरिसच्या ऑलिम्पिक मध्ये 11  ऑगस्ट पर्यंत इव्हेंट्स आहेत. मनू भाकर कडे सांगता सोहळ्यात नेतृत्त्व करण्याची संधी देण्यात आली आहे.