IPL Auction 2025 Live

Rishabh Pant याला करायचाय नवा घरोबा; कुटुंबीयही म्हणतायत घर घे घर! नेटकऱ्यांनी दिले भन्नाट सल्ले, पहा Tweets

पंत जेव्हापासून ऑस्ट्रेलियातून परतला आहे त्याचे कुटुंबीय एका विशिष्ट कारणास्तव त्याच्या मागे पडले आहे आणि त्याने ही गोष्ट स्वत: ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

रिषभ पंत (Photo Credit: Instagram)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नुकत्याच संपुष्टात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेत टीम इंडियाचा (Team India) युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) शानदार कामगिरी केली. ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात पंतचा मोलाचा वाटा होता. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेचा अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला गेला. ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test) जिंकत भारताने थरारक तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. पंत जेव्हापासून ऑस्ट्रेलियातून परतला आहे त्याचे कुटुंबीय एका विशिष्ट कारणास्तव त्याच्या मागे पडले आहे आणि त्याने ही गोष्ट स्वत: ट्विटरद्वारे शेअर केली आहे. पंतने ट्विटरवर लिहिले की, "मी जेव्हापासून ऑस्ट्रेलियाहून आलो आहे, नवीन घर घेण्यास घरातले मागे पडले आहेत. गुरुग्राम बरोबर असेल का? इतर काही पर्याय असल्यास मला सांगा." पंतचे हे ट्विट काही क्षणात व्हायरल झाले आणि चाहत्यांना त्यावर मजेदार टिप्पण्या देऊन सल्ला देण्यास सुरुवात केली. (ICCने ‘Player of the Month’ पुरस्काराची केली घोषणा, रिषभ पंत, अश्विनसह टीम इंडियाचे 'हे' तडाखेबाज खेळाडू शर्यतीत)

5 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी पंत टीम इंडिया कसोटी संघाचा भाग आहे. पहा पंतचे ट्विट:

मेट्रो स्टेशनच्या जवळ!

हैदराबाद ये!

दिल्ली ये!

गब्बाचा कब्जा मिळाला?

अगदी कोहली आणि रोहितमधेही हा प्रश्न विचारण्याचे धाडस नसेल

ग्रेटर नोएडा...स्वस्त मिळेल!

रांचीमध्ये घर घे... अभ्यास आणि मस्ती दोन्ही होईल!

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पंतने तिसऱ्या सार्वधिक धावा केल्या. त्याने तीन सामन्यांच्या पाच डावांमध्ये 274 धावा केल्या. पंतने क्रमशः 29, 36, 97, 23 आणि नाबाद 89 धावांची खेळी साकारली. पंतने नुकतीच एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांना भेट दिली होती. साक्षीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता, जिथं तिघे आनंदात वेळ घालवताना दिसत होते. या दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी हिरव्या रंगाच्या पार्टीची टोपी घातलेला दिसला.