Rishbah Pant Breaks MS Dhoni Record: बंगळुरू कसोटीत ऋषभ पंतची शानदार फलंदाजी, धोनीचा विक्रम काढला मोडीत

चौथ्या दिवशी पंतने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. यासह पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीत 2500 धावा पूर्ण केल्या. आता पंतने एका प्रकरणात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे.

Rishabh Pant (Photo Credit - X)

IND vs NZ 1st Test 2024: बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंतने (Rishabh Pant) पुनरागमन केले. पंत चौथ्या दिवशी सरफराज खानसोबत फलंदाजीला आला. याआधी पंतला दुसऱ्या दिवशी गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे पंतला तिसऱ्या दिवशी बाहेर राहावे लागले. चौथ्या दिवशी पंतने फलंदाजीत शानदार पुनरागमन केले. चौथ्या दिवशी पंतने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. यासह पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीत 2500 धावा पूर्ण केल्या. आता पंतने एका प्रकरणात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे.

पंतने धोनीचा विक्रम काढला मोडीत

बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याच्या 2500 कसोटी धावा पूर्ण केल्या. आता पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावा पूर्ण करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. याआधी, एमएस धोनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावा पूर्ण करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज होता. धोनीने 69 व्या डावात 2500 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. तर पंतला 2500 धावा पूर्ण करण्यासाठी 62 डाव लागले. (हे देखील वाचा: Rohit Sharma Viral Video: चाहत्याने रोहित शर्माला विचारले आयपीएलमध्ये कोणती टीम? कर्णधाराने दिले मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ)

टीम इंडिया पहिल्या डावात 46 रन्सवर ऑलआऊट

बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 46 धावांत आटोपली. जी टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमधील तिसरी सर्वात कमी धावसंख्या होती. याशिवाय घरच्या मैदानावर प्रथमच टीम इंडिया इतक्या कमी धावसंख्येवर बाद झाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने अप्रतिम पुनरागमन केले आणि आता टीम इंडिया मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.