IND vs WI 2nd ODI मॅचआधी रिषभ पंत याने शेअर केला हॉटेलमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ, 'गर्लफ्रेंड' ईशा म्हणाली-मिस यू, पहा Video
या व्हिडिओमध्ये पंत हॉटेलच्या मोकळ्या पॅसेजमध्ये सराव करताना दिसत आहे. पंतने शेअर केल्या व्हिडिओत त्याच्यासोबत कुलदीप यादव देखील दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पंतने लिहलं, "कुठं, कधी, काय आणि कोण... नो सॉरी.. का ते फक्त मला माहीती आहे."
भारत (India) आणि इंडिज (West Indies) आज दुसऱ्या वनडे सामन्यात आमने-सामने येतील. दोन्ही संघातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे खेळाडूंची आणि चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याने अखेरच्या टी-20 सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. यंदाच्या विंडीज दौऱ्यावर पंतला माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या ऐवजी संघात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे विंडीज दौऱ्यावर त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. आणि त्यासाठी तो अथक परिश्रम देखील करताना दिसत आहे. पंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत हॉटेलच्या मोकळ्या पॅसेजमध्ये सराव करताना दिसत आहे. पंतने शेअर केल्या व्हिडिओत त्याच्यासोबत कुलदीप यादव (Kuldeep Yadav) देखील दिसत आहे. (Live Streaming of IND vs WI, 2nd ODI Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर)
भारत-विंडीजमधील अखेरच्या टी-20 सामन्यात पंतने विजयी कामगिरी केली होती. पंतने 42 चेंडूत 65 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला होता. भारताच्या विंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्याआधी पंत आणि कुलदीप हॉटेलच्या मोकळ्या पॅसेजमध्ये यष्टीरक्षणाचा सराव करत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पंतने लिहलं, "कुठं, कधी, काय आणि कोण... नो सॉरी.. का ते फक्त मला माहीती आहे." पंतच्या या व्हिडिओवर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हिने आपली प्रतिक्रिया देत लिहिले 'मिस यू'. आयपीएलदरम्यान रिषभने स्वतः तिचा फोटो शेअर करत आपल्या नात्याबद्दल सर्व जगाला सांगितले होते. तो फोटो शेअर करत पंतने लिहिले, "माझ्या आयुष्यातील आनंद हेच कारण आहे.'
दरम्यान, भारत-विंडीजमधील दुसरा वनडे सामना आज रविवारी पोर्ट ऑफ स्पेन मैदानात रंगणार आहे. आजचा हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्न असेल. दुसरीकडे, भारतविरुद्ध वनडे मालिके ही ख्रिस गेल (Chris Gayle) याची अखेरची मालिका असणार आहे त्यामुळे विंडीज संघ देखील त्याला विजयी सलामी देऊन अलविदा करण्याच्या हेतूने खेळ करेल.