RCB vs RR IPL 2021: Virat Kohli ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कमाल करणारा RCB कर्णधार ठरला पहिलाच फलंदाज!

विराटने आपल्या 40व्या आयपीएल अर्धशतकासह या प्रतिष्ठ लीगमध्ये 6000 धावांचे शिखर सर केले आहे. आयपीएलमध्ये ही कमाल करणारा आरसीबी कर्णधार पहिलाच फलंदाज (देशी-विदेशी) ठरला आहे. विराटने या ऐतिहासिक कामगिरीत 5 शतक आणि 40 अर्धशतके ठोकली आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

Virat Kohli IPL Runs: इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराटने आपल्या 40व्या आयपीएल अर्धशतकासह या प्रतिष्ठ लीगमध्ये 6000 धावांचे शिखर सर केले आहे. आयपीएलमध्ये ही कमाल करणारा आरसीबी कर्णधार पहिलाच फलंदाज (देशी-विदेशी) ठरला आहे. विराटने या ऐतिहासिक कामगिरीत 5 शतक आणि 40 अर्धशतके ठोकली आहेत. आयपीएलच्या इतिहासात आजवर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट आघाडीवर आहे तर टॉप-5 फलंदाजांच्या एलिट यादीत चार भारतीय आणि फक्त एक विदेशी फलंदाजाचा समावेश आहे. विशेष म्हणजे विराटसोबत या यादीत आयपीएलमधील आणखी दोन कर्णधारांचा समावेश आहे. (RCB vs RR IPL 2021 Match 16: ‘विराटसेने’ची विजयी घोडदौड कायम, कोहली- शतकवीर पडिक्क्लच्या वादळी खेळीमुळे बेंगलोरचा राजस्थानला 10 विकेट्सने धोबीपछाड)

कोहली हा सध्याच्या पिढीतील सर्वांत उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघासह आयपीएलमधील कामगिरी देखील सुधारली आणि याचा पुरावा म्हणजे तो आज लीगच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर विराटनंतर या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज सुरेश रैना आहे. रैनाने 197 आयपीएल सामन्यात 5448 धावा केल्या असून यादरम्यान त्याने 1 शतक आणि 39 अर्धशतके ठोकली आहेत. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा शिखर 5428 धावा करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर 5384 धावा आणि मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा 5368 धावा करून अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ पाच खेळाडूंना 5000 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे.

आजच्या आयपीएल सामन्याबद्दल बोलायचे तर राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तर आरसीबीने एकही विकेट न गमावता 16.3 ओव्हरमध्ये एकतर्फी विजय मिळवला. संघाचा युवा सलामीवीर देवदत्त पडिक्क्लने 52 चेंडूंमध्ये 11 चौकार व सहा षटकारांच्या मदतीने 101 धावांची नाबाद शतकी खेळी केली तर कोहलीने 47 चेंडूत सहा चौकार व तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा फटकावल्या.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना