IPL Auction 2025 Live

RCB vs RR, IPL 2020: देवदत्त पड्डीकल-विराट कोहलीचे तुफान अर्धशतक, रॉयल चॅलेंजर्सचा राजस्थानवर 8 विकेटने मिळवला मोठा विजय; Points Tableमध्ये पटकावलं अव्वल स्थान

बेंगलोरकरून सलामी फलंदाज देवदत्त पड्डीकलने आयपीएलमधील दुसरे अर्धशतक ठोकले आणि 63 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहली देखील यंदा मागे राहिला नाही आणि 72 धावांवर नाबाद परतला.

देवदत्त पड्डीकल-विराट कोहली (Photo Credit: Twitter/IPL)

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पहिले फलंदाजी करून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) दिलेल्या 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत  रॉयल चॅलेंजर्सने 8 विकेट आणि 5 चेंडू शिल्लक असताना मोठा विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्सचा यंदाच्या आयपीएलमधील हा तिसरा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सने दिलेले लक्ष्य ठेवले रॉयल चॅलेंजर्सने सहज गाठले. बेंगलोरकरून सलामी फलंदाज देवदत्त पड्डीकलने (Devdutt Padikkal) आयपीएलमधील (IPL) दुसरे अर्धशतक ठोकले आणि 63 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील यंदा मागे राहिला नाही आणि 72 धावांवर नाबाद परतला. दरम्यान, विराटचे यंदाच्या आयपीएलमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.एबी डिव्हिलियर्सने नाबाद 12 धावा केल्या. आरसीबीच्या (RCB) या विजयासह त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. आरसीबी 4 सामन्यांपैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवून 6 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहेत. (RCB vs RR, IPL 2020: आउट की नॉट आउट? संजू सॅमसनच्या विकेटची रंगली चर्चा, अनियंत्रित निर्णयावरून नेटकऱ्यांनी थर्ड अंपायरला सुनावलं Watch Video)

राजस्थानचे गोलंदाज आज प्रभावी कामगिरी करू शकले नाही. आरसीबीला आरोन फिंचच्या रूपात एकमात्र विकेटचे नुकसान झाले. फिंच आज 8 धाव करून माघारी परतला. त्यानंतर देवदत्त आणि विराटने टीमला विजय रेषा ओलांडून दिली. दोंघांमध्ये 99 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, विराट ने 41 चेंडूत यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, आजच्या सामन्यात राजस्थानकडून स्टिव्ह स्मिथ, जोस बटलर आणि संजू सॅमसन,असे आघाडीचे तीनही फलंदाज 31 धावांवर बाद झाल्यानंतर लोमरोरने रियान परागबरोबर चांगली भागीदारी केली आणि टीमचा डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर डेथ ओव्हर्समध्ये तेवतियाने 24 धावांची नाबाद आक्रमक फलंदाजी करत संघाला सन्माननीय धावसंख्या मिळवून दिली. लोमरोरने सर्वाधिक 47 रन केले. राहुल टेवटियाने 12 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 24 रन आणि जोफ्रा आर्चरने 10 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 16 रनमुळे राजस्थानला 150 रनचा टप्पा गाठता आला.

बेंगलोरकडून युजवेंद्र चहलने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर इसरू उदानाला 2 आणि नवदीप सैनीला 1 विकेट मिळाली. यंदाच्या आयपीएलमधील डबल हेडरचा हा पहिला सामना होता.