RCB Vs KKR IPL 2021 Match 10 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी, कुठे आणि कसा पाहणार? घ्या जाणून
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स (Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज (18 एप्रिल) आपीएलच्या चौदाव्या हंगामातील दहावा सामना खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानात (M. A. Chidambaram Stadium) पार पडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. तर, कोलकाता नाईट राईडर्स संघाचे कर्णधार पद इयॉन मॉर्गन संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल तर टॉस अर्धातासपूर्वी, 3.00 वाजता होईल. हैदराबाद आणि बेंगलोर आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यातील आयपीएलचा दहावा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा- MI vs SRH IPL 2021 Match 9: Jasprit Bumrah याचा मोठा धमाका, आयपीएलमध्ये चौथ्यांदा केली ‘ही’ खास कमाल

संघ-

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पद्धिकल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल ख्रिश्चन, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झंपा, सचिन बेबी , श्रीकर भारत, नवदीप सैनी, पवन देशपांडे, मोहम्मद अझरुद्दीन, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, डॅनियल सॅम, रजत पाटीदार

कोलकाता नाइट रायडर्सइयोन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, साकिब अल हसन, पॅट कमिन्स, प्रसिद्धी कृष्णा, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंह, बेन कटिंग, लॉकी फर्ग्युसन, शेलडन जॅक्सन , कुलदीप यादव, गुरकीतसिंग मान, व्यंकटेश अय्यर, वैभव अरोरा, कमलेश नगरकोटी, करुण नायर, सुनील नारायण, पवन नेगी, संदीप वॉरियर, टिम सेफर्ट, शिवम मावी

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.