IPL 2020: दस का दम! RCB विरुद्ध KKR सामन्यात शतकी भागीदारीने विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सने नोंदवला अनोखा विक्रम
आयपीएलमधील त्यांची दहावी शतकी भागीदारी होती आणि अशी कामगिरी आयपीएलमध्ये करणारी त्यांची पहिलीच जोडी ठरली.
RCB vs KKR, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या शतकी भागीदारीने आरसीबीला (RCB) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) सामन्यात 195 धावांपर्यंत मजल मारून दिली. 94 धावांपर्यंत दोन्ही सलामी फलंदाजी माघारी परतल्यावर विराट आणि डिव्हिलियर्सने डाव हाताळला आणि विक्रमी शतकी भागीदारीत केली. आरोन फिंच आणि देवदत्त पडिक्कलच्या सलामी जोडीने पुन्हा एकदा आरसीबीला शानदार सुरुवात करून दिली. दोंघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली असताना प्रसिद्ध कृष्णाने देवदत्तला बोल्ट करून माघारी पाठवले आणि टीमला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर 94च्या धावसंख्येवर फिंचला आंद्रे रसेलने बोल्ड करून परतीचा मार्ग दाखवला. पण, त्यानंतर खेळपट्टीवर विराट आणि डिव्हिलियर्सची घातक जोडी आली व दोघांनी आपल्या ट्रेडमार्क शैलीत फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. (RCB vs KKR, IPL 2020: शारजाह येथे विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सने उभारला धावांचा डोंगर, नाईट रायडर्स समोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान)
तिसऱ्या विकेटसाठी कोहली-डिव्हिलियर्सच्या जोडीने शतकी भागीदारी केली. जी आयपीएलमधील त्यांची दहावी शतकी भागीदारी होती आणि अशी कामगिरी आयपीएलमध्ये करणारी त्यांची पहिलीच जोडी ठरली. कोहली आणि डिव्हिलिअर्सच्या जोडीनंतर विराट आणि क्रिस गेलच्या जोडीने 9 वेळा शतकी भागीदारी केली आहे. कोहली-डिव्हिलिअर्सची जोडी आयपीएलमधील सर्वात घटक जोडींपैकी एक आहे. केकेआरविरुद्ध शारजाह येथे सुरु असलेल्या सामन्यात देवदत्तने 32 आणि फिंच 47 धावा करून बाद झाले तर विराट 33 आणि डिव्हिलिअर्स 73 धावा करून नाबाद परतले.
विराट आणि डि व्हिलिअर्सच्या भागीदारीने आयपीएलमध्ये 3000 धावांचा टप्पा देखील गाठला. डिव्हिलियर्सने आज 33 चेंडूत नाबाद 73 धावांची सर्वाधिक अर्धशतकी खेळी खेळली. डिव्हिलियर्सने त्याच्या शानदार खेळीत चार चौकार आणि पाच षटकार लगावले. कोहलीने आजच्या डावात एका चौकारच्या मदतीने 28 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. देवदत्त आणि फिंचच्या चांगल्या सुरुवातीचा विराट आणि डिव्हिलिअर्सने अखेरीस आरसीबीला मोठा फायदा करून दिला आणि टीमसाठी आश्वासक धावसंख्या उभारली.