RCB vs KKR, IPL 2020: आरसीबी गोलंदाजांपुढे KKRने लोटांगण घातलं, नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव करत मिळवला सर्वत मोठा विजय

कमलेश नागरकोटी नाबाद आणि वरुण चक्रवर्ती नाबाद धावा करून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यातील सामन्यात आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 194 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात केकेआरने लोटांगण घातलं आणि 82 धावांनी सर्वात मोठा पराभव पत्करला. आरसीबीने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात केकेआरला 112 धावांपर्यंतच मजल मारता आली.

RCB vs KKR, IPL 2020: आरसीबी गोलंदाजांपुढे KKRने लोटांगण घातलं, नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव करत मिळवला सर्वत मोठा विजय
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

RCB vs KKR, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 13व्या सत्रातील 28वा सामना शारजाह येथे खेळला गेला. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत आरसीबीने (RCB) 20 ओव्हरमध्ये 194 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात केकेआरने (KKR) लोटांगण घातलं आणि 82 धावांनी सर्वात मोठा पराभव पत्करला. आरसीबीने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात केकेआरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 112 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआरसाठी शुभमन गिलने (Shubman Gill) सर्वाधिक 34 धावांचा डाव खेळला, आंद्रे रसेल राहुल त्रिपाठी यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. अन्य एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकला नाही. या विजयसह आरसीबीने 7 सामन्यात 10 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले, तर केकेआरची चौथ्या स्थानी घसरण झाली. आरसीबी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर केकेआर फलंदाज जास्त काळ टिकू शकले नाही. (IPL 2020: दस का दम! RCB विरुद्ध KKR सामन्यात शतकी भागीदारीने विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सने नोंदवला अनोखा विक्रम)

लक्ष्याचा पाठलाग करताना टॉम बंटन कोलकाताकडून शुभमनसह सलामीला आला. सैनीने बंटनला 8 धावांवर बोल्ड केले. नितीश राणाका अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने क्लीन बोल्ड करत परत पाठवले. कोलकाताला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा सेट फलंदाज शुभमन 34 धावा काढून बाद झाला. उदानाच्या थ्रोवर विकेटकीपर डिव्हिलियर्सने त्याला धावबाद केले. मागील सामन्यात तुफान अर्धशतक झळकावणारा कर्णधार दिनेश कार्तिक चहलच्या चेंडूवर अवघी 1 धावा करून बोल्ड झाला. यानंतर इयन मॉर्गनला सुंदाराने आपल्या फिरकीत अडकवले आणि उदानाकडे झेलबाद केले. जीवनदान मिळवल्यानंतर काही मोठे शॉट्स मारल्यानंतर आंद्रे रसेल 10 धाव करून माघारी परतला. पॅट कमिन्सने 1 धाव केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने राहुल त्रिपाठीला मॉरिसकडे झेलबाद केले. वॉशिंग्टन सुंदर आणि क्रिस मॉरिसने प्रत्येकी 2 तर नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि इसुरु उडानाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

यापूर्वी विराटच्या नाबाद 33 आणि डिव्हिलिअर्सच्या नाबाद 73 धावांच्या जोरावर आरसीबीने शारजाह येथे आव्हानात्मक धावसंख्या उभारली. आरसीबीच्या सलामीवीर आरोन फिंच आणि देवदत्त पद्धिकल (32) यांनी पहिल्याच चेंडूपासून वेगवान धावा करण्यास सुरवात केली. फिंच 47 आणिदेवदत्तने32 धावांचे योगदान दिले.

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2020 11:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).