Bengaluru Beat Punjab, Qualifier 1 Scorecard: आरसीबीचा 'ब्लॉकबस्टर' शो, 9 वर्षांनी अंतिम फेरीत केला प्रवेश; क्वालिफायर-1 मध्ये पंजाबचा 8 गडी राखून पराभव

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह, बंगळुरूने 9 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी आरसीबीने 2016 मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात पंजाबचा संपूर्ण संघ प्रथम खेळताना 101 धावांवर ऑलआउट झाला होता. प्रत्युत्तरात, आरसीबीने 10 षटके शिल्लक असताना दणदणीत विजय मिळवला आहे.

Bengaluru Beat Punjab, Qualifier 1 Scorecard: आरसीबीचा 'ब्लॉकबस्टर' शो, 9 वर्षांनी अंतिम फेरीत केला प्रवेश; क्वालिफायर-1 मध्ये पंजाबचा 8 गडी राखून पराभव
Philip Salt (Photo Credit- X)

RCB vs PBKS, IPL 2025 Qualifier 1: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा पहिला क्वालिफायर सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह, बंगळुरूने 9 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी आरसीबीने 2016 मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात पंजाबचा संपूर्ण संघ प्रथम खेळताना 101 धावांवर ऑलआउट झाला होता. प्रत्युत्तरात, आरसीबीने 10 षटके शिल्लक असताना दणदणीत विजय मिळवला आहे.

जोश हेझलवूड आणि सुयश शर्माची घातक गोलंदाजी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात निराशाजनक झाली आणि अर्धा संघ अवघ्या 50 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाब किंग्जने  षटकांत दहा गडी गमावून 101 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून मार्कस स्टोइनिसने नाबाद 26 धावांची सर्वाधिक खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 17 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. मार्कस स्टोइनिस व्यतिरिक्त, प्रभसिमरन सिंग आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनी 18-18 धावा केल्या. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

फिलिप सॉल्टची सर्वाधिक 56 धावांची नाबाद खेळी

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केवळ 10 षटकांत दोन विकेट गमावून लक्ष्य गाठले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून स्फोटक सलामीवीर फिलिप सॉल्टने सर्वाधिक 56 धावांची नाबाद खेळी केली. या स्फोटक खेळीदरम्यान फिलिप सॉल्टने 27 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. फिलिप सॉल्ट व्यतिरिक्त, मयंक अग्रवालने 19 धावा केल्या. आता पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. उद्याच्या एलिमिनेटर सामन्यात पंजाबचा विजेत्या संघाशी सामना होणार.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 10:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).