IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये 'सर रवींद्र जडेजा' विक्रमी कामगिरीची नोंद

आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकावणारा जाडेजा पहिला खेळाडू ठरला आहे.

(Photo Credits: Getty Images)
यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने आपली निवड सार्थक ठरवली. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारताला विजयासाठी 240 धावांची आवश्यकता होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची दाणादाण उडाली. आघाडीचे तिन्ही फलंदाज-रोहित शर्मा (Rohit Sharma), के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) किवी गोलंदाजांसमोर फेल झाले. मात्र रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत एम एस धोनी (MS Dhoni) याच्या साथीने भारताच्या आशा कायम ठेवल्या. दरम्यान, जाडेजाने आक्रमक किवी गोलंदाजांचा सामना करत अर्धशतक झळकावलं. (IND vs NZ World Cup Semi-Final 2019: न्यूझीलंड विरुद्ध झुंझार खेळीबद्दल संजय मांजरेकर कडून रवींद्र जडेजा याचे कौतुक, वाचा Tweet)
न्यूझीलंडविरुद्ध जडेजाची अर्धशतकी खेळी महत्वाची होती. जडेजा मैदानावर आला तेव्हा भारताचा स्तिथी 6 बाद 92 धावा अशी होती. दरम्यान, विश्वचषकच्या सेमीफायनल सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकावणारा जाडेजा पहिला खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात जडेजाने फलंदाजीसोबत गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आपली चमक दाखवली.
दुसरीकडे, भारताला नमवून न्यूझीलंड संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचला आहे. या आधी 2015 च्या विश्वचषकमध्ये न्यूझीलंड पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचला होता. फायनलमध्ये किवी संघाला ऑस्ट्रेलिया (Australia) कडून पराभव पत्करावा लागला.