IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचआधी रवींद्र जडेजा याने उघडकीस केले टीम इंडिया चे मजेदार रहस्य, पहा (Video)
अष्टपैलू रवींद्र जडेजा याने आयसीसीच्या एका व्हिडिओमध्ये द्वारे भारतीय क्रिकेट संघातील काही मजेदार रहस्य उघडकीस केलेत. या व्हिडिओमध्ये, जडेजा यांनी धोनी, विराट, शिखर धवन, मोहम्मद शमी, रोहित शर्मा यांच्यासह अन्य सहकाऱ्यांविषयी काही मजेदार तथ्ये उघडली.
आयसीसी (ICC) विश्वचषकमधील भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताच अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सर्वांना आपल्या गोलंदाजीनी छाप सोडली आहे. आता, डावखुरा फलंदाज आयसीसीच्या एका व्हिडिओमध्ये द्वारे भारतीय क्रिकेट संघातील काही मजेदार रहस्य उघडकीस केलेत. या व्हिडिओमध्ये, जडेजा यांनी एम एस धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli), शिखर धवन (Shikhar Dhawan), मोहम्मद शमी (Mohammed Shami), रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह अन्य सहकाऱ्यांविषयी काही मजेदार तथ्ये उघडली. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये पावसानंतर विरेंद्र सेहवाग ची दमदार बॅटिंग, डकवर्थ लुईस नियमाची फिरकी घेत केले हे भन्नाट Tweet)
जडेजा यांनी महेंद्र सिंघ धोनी ला संघातील सर्वात वाईट डान्सर म्हटले आणि सांगितले की सलामीवीर शिखर धवन नेहमीच त्यांच्या सेलफोनवर असतो. जडेजाने हे देखील सांगितले की कर्णधार विराट नेहमी जास्त जिममध्ये दिसतो. जडेजाचा हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसी ने लिहिले, ""उत्साही ऑन आणि ऑफ फील्ड. पहा रवींद्र जडेजा #दिशदडर्ट".
A live-wire on the field and off it too. Watch Ravindra Jadeja #DishTheDirt on his team-mates 🤭 pic.twitter.com/ALfIRRTja9
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 10, 2019
दरम्यान, जडेजाने श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध मॅचमधून 2019 आयसीसी विश्वचषकमध्ये पदार्पण केले. सध्या, जडेजा भारताच्या न्यूझीलंडविरुद्ध संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये आहे. त्याने आपल्या 10 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 34 धावा दिल्या. दुसरीकडे, भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमधील सामना मंगळवारी पावसामुळे थांबवण्यात आला होता. त्यामुळे आज राखीव दिवशी सामना सुरु होणार आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या होत्या.
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2019 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

