IND vs BAN Test Series 2024: कसोटी क्रिकेटमधील 'या' अनोख्या विक्रमाच्या अगदी जवळ रवींद्र जडेजा, चेन्नईत खास विक्रम करण्याची संधी

दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंच्या दोन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

Team India (Photo Credit - X)

IND vs BAN Test Series: श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) आता विश्रांतीवर आहे. टीम इंडियाला आता सप्टेंबरमध्ये बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध पुढील मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंच्या दोन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. यानंतर न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघासोबतही स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये विशेष त्रिशतक झळकावण्याच्या अगदी जवळ आहे. (हे देखील वाचा: Duleep Trophy 2024 Squads Announced: दुलीप ट्रॉफीसाठी चारही संघ जाहीर, रोहित-विराट नव्हे तर 'हे' खेळाडू झाले कर्णधार)

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा कसोटी सामना सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल.

रवींद्र जडेजाकडे कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी 

रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळविण्याच्या अगदी जवळ आहे. रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी आतापर्यंत 72 टेस्ट मॅचमध्ये 294 विकेट घेतल्या आहेत. चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने 6 विकेट घेतल्यास तो अनोखा इतिहास रचेल. रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण करणार आहे. चेन्नई आणि कानपूर येथे कसोटी मालिकेतील दोन सामने खेळवले जातील, या दोन्ही मैदानांवर फिरकीपटूंना मोठी मदत मिळते. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विक्रमांची मालिका रचण्याची सुवर्णसंधी रवींद्र जडेजाकडे असेल.

चेन्नईत मेगा रेकॉर्ड करण्याची संधी

टीम इंडियाचा घातक अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला चेन्नईत हा खास विक्रम करण्याची सुवर्णसंधी असेल. चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा बांगलादेशच्या फलंदाजांसाठी जीवघेणा ठरू शकतो. रवींद्र जडेजाने 72 कसोटी सामन्यात 294 विकेट घेतल्या आहेत आणि 3036 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने 13 वेळा कसोटी सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रवींद्र जडेजाने दोन वेळा कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

अनिल कुंबळे टाॅप वर

टीम इंडियासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रवींद्र जडेजाने 197 एकदिवसीय सामन्यांमध्ये 220 आणि 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 54 बळी घेतले आहेत. रवींद्र जडेजाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2756 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 515 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

अनिल कुंबळे – 619 कसोटी विकेट्स

आर अश्विन – 516 कसोटी विकेट्स

कपिल देव - 434 कसोटी विकेट्स

हरभजन सिंग – 417 कसोटी विकेट्स

इशांत शर्मा/झहीर खान – 311 कसोटी विकेट्स

रवींद्र जडेजा - 294 कसोटी विकेट्स.