ICC World Cup 2019: टीम इंडियाच्या पराभवानंतर कोच रवी शास्त्री यांच्यावर टांगती तलवार, पदावरून हकालपट्टीची शक्यता

विश्वचषकमधून बाहेर पडल्यानंतर भारताचे कोच रवि शास्त्री यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे.त्याचे कारण म्हणजे, शास्त्री प्रशिक्षक असल्या पासून टीम इंडियाने एकी मोठी स्पर्धा जिंकलेली नाही.

रवी शास्त्री (Photo Credits: Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभवानंतर भारतीय संघावर (Indian Team) चहू बाजूने टीका होत आहे. एकीकडे माजी कर्णधार महेंद्र सिंघ धोनी (Mahendra Singh Dhoni) याला आपल्या संथ खेळीनंतर निवृत्ती जाहीर करावी अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे, भारताचे कोच रवि शास्त्री (Ravi Shastri) यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे.त्याचे कारण म्हणजे, शास्त्री प्रशिक्षक असल्या पासून टीम इंडियाने एकी मोठी स्पर्धा जिंकलेली नाही आणि भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. (IND vs NZ, ICC CWC 2019 Semi-Final: टीम इंडियाच्या पराभवानंतर एडम गिलक्रिस्ट ने केले धोनी चे समर्थन, Tweet वाचून फॅन्स होतील खुश)

दरम्यान, विश्वचषकमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतर शास्त्रींची हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शास्त्रींचे जरी कौतुक करत असले तरी, बीसीसीआय (BCCI) अधिकारी मात्र शास्त्रींवर नाराज आहेत. शास्त्री हे 2007 पासून टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाले होते. शास्त्री यांचा करार हा विश्वचषकनंतर संपणार आहे, त्यामुळे बीसीसीआय त्यांची हकालपट्टी करण्याच्या विचारत आहेत. यावर्षी मार्चमध्ये बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत संकेत देखील दिले होते.

2017 मध्ये माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी कोच पदाचा राजीनामा दिल्यावर शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2017 मध्ये शास्त्रींनीं कोचपद सांभाळ्यापासून भारतीय संघाने टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. मात्र भारताला एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही.