Ravi Shastri On Wriddhiman Saha: रिद्धिमान साहाला धमकी, संतापलेल्या रवी शास्त्रींनी बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांच्याकडे केली ही मागणी

हे प्रकरण मिटलेही नव्हते की साहाने आणखी एका नव्या वादाला फोडणी दिली आहे. शनिवारी साहाने व्हॉट्सअॅप स्क्रीन चॅट शेअर केले आणि सांगितले की, एका सीनियर पत्रकाराने मला मुलाखत देण्यासाठी धमकावले आहे.

(Photo Credit - Insta)

भारताचा कसोटी यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) आगामी मायदेशातील कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघात स्थान मिळाले नाही. पुढील वाटचाल लक्षात घेऊन भारतीय निवडकर्त्यांना साहाच्या जागी ऋषभ पंत (Rushab Panth) आणि केएस भरत (K S Bharath) यांना संधी दिली. साहाला टीम इंडियातून वगळल्यानंतर साहाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर (Rahul Dravid) निशाणा साधला होता. साहाने म्हटले आहे की द्रविडने त्याला निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले होते. हे प्रकरण मिटलेही नव्हते की साहाने आणखी एका नव्या वादाला फोडणी दिली आहे. शनिवारी साहाने व्हॉट्सअॅप स्क्रीन चॅट शेअर केले आणि सांगितले की, एका सीनियर पत्रकाराने मला मुलाखत देण्यासाठी धमकावले आहे.

रवी शास्त्री यांचा साहाला पांठिबा

रिद्धिमान साहाच्या या आरोपानंतर त्याला क्रिकेट जगतातून पाठिंबा मिळत आहे. आता या एपिसोडमध्ये टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी साहाला पांठिबा दिला आहे. सोशल मीडियावर साहाचे समर्थन करताना शास्त्रींनी आश्चर्य व्यक्त केले. 59 वर्षीय शास्त्री यांनी ट्विट केले की, "एका पत्रकाराकडून खेळाडूला धमकावले जात आहे, हे अतिशय आश्चर्यकारक आहे. हा त्याच्या पदाचा दुरुपयोग आहे. भारतीय संघासोबत हे सातत्याने घडत आहे. बीसीसीआय अध्यक्षांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. ती व्यक्ती कोण आहे हे शोधायला हवे. हे प्रत्येक क्रिकेटपटूच्या हिताचे आहे. ही गंभीर बाब असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

Tweet

प्रकरण काय आहे? 

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियातून काही खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये यष्टिरक्षक रिद्धिमान साहा यांचा समावेश आहे. संघ निवडीनंतर त्याने एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी एका पत्रकारासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट दाखवले. त्या स्क्रीनशॉटमध्ये एक पत्रकार साहाला मुलाखतीसाठी धमकावत असल्याचे दिसून आले. भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर एका ‘प्रतिष्ठित’ पत्रकाराकडून मला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. पत्रकारिता इथेच संपते, असंही साहानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. (हे ही वाचा IND vs WI T20I Series: भारतविरुद्ध वेस्ट इंडिज T20I मालिकेत व्यंकटेश अय्यरची दमदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्यांचे भवितव्य धोक्यात ? सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत मजेदार मीम्स, पहा फोटो)

बीसीसीआयनं गुरुवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानंतर काल भारतीय संघाची घोषणा केली. दरम्यान, रिद्धिमान साहासह भारताच्या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलंय.