Rashid Khan's Wife: गुगलवर राशीद खानच्या पत्नीचं नाव सर्च करताच समोर आलं अनुष्का शर्माचं नाव, पाहा काय आहे घोळ
हा सर्व एक मोठा गोंधळ Google सर्च बारमुळे झाला आहे. जेव्हा कोणी ‘राशिद खान पत्नी’ असे गुगलवर सर्च करते तेव्हा उत्तर म्हणून अनुष्का शर्मा समोर येते. पण या सर्वांमागे एक कारण आहे.
बॉलीवूड अभिनेत्री आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) चाहत्यांमध्ये आज चांगलाच गोंधळ झाला. अफगाणिस्तानचा क्रिकेट स्टार राशिद खान (Rashid Khan) आणि अनुष्काचे लग्न झाले असल्याचे सध्या समोर आले आहे. अर्थात, हा सर्व एक मोठा गोंधळ Google सर्च बारमुळे झाला आहे. जेव्हा कोणी ‘राशिद खान पत्नी’ (Rashid Khan Wife) असे गुगलवर सर्च करते तेव्हा उत्तर म्हणून अनुष्का शर्मा समोर येते. पण या सर्वांमागे एक कारण आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, राशिदला नुकतंच एका इन्स्टाग्राम प्रश्नात त्याच्या आवडत्या महिला अभिनेत्याचे नाव विचारण्यात आले. यावर राशिद म्हणाला की त्याला अनुष्का आणि प्रिती झिंटा पाहणे खूप आवडते. यामुळे कदाचित Google सर्च इंजिनवर गोंधळ निर्माण झाला असेल. जसे एखाद्याने ‘मूर्ख’ शोधल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे फोटो समोर येते. (IPL 2020: RCB कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज 90 धावांच्या डावावर पत्नी अनुष्का शर्माने दिला Flying Kiss, पाहून तुम्हीही म्हणाल How Sweet!)
दरम्यान, 22 वर्षीय फिरकीपटू अफगाणिस्तानच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. तथापि, काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका संवादात राशिद खानने एका मुख्य कारणास्तव तो लग्न करणार नसल्याचे उघड केलं होतं. राशिद म्हणाला की अफगाणिस्तानला पहिले वर्ल्ड कप जिंकण्यास मदत करणे हे त्याचे ध्येय आहे आणि त्यानंतरच तो लग्नाबद्दल विचार करेल. “अफगाणिस्तानने क्रिकेट विश्व जिंकल्यानंतर मी साखरपुडा आणि लग्न करेन,” असे आझादी रेडिओशी बोलताना राशिद खान म्हणाला.
अफगाणिस्तान 2015 आणि 2019 विश्वचषकात लीग स्टेज अडथळा पार करण्यात अपयशी ठरला होता. वर्ल्ड कपमध्ये झालेल्या त्यांच्या 15 सामन्यांपैकी अफगाणिस्तानला फक्त एक विजय मिळवण्यात यश आले आहे. स्कॉटलंडविरुद्ध 2015 मध्ये डुनेडिन येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत एका विकेटने विजय मिळवला होता. इतकंच नाही तर 2019 वर्ल्ड कपमध्ये राशिद खानने नऊ सामन्यात सहा विकेट्स घेतल्या होत्या आणि भारत व पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ते विजयी स्थितीत असले तरी एकाही सामना जिंकण्यात अपयशी ठरले होते. दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचा रेकॉर्ड चांगला असून त्यांनी 14 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये 6.53 च्या इकॉनॉमीने 11 विकेटसह राशिद दुसरा यशस्वी गोलंदाज होता.