Ranji Trophy: आजपासून सुरु होणार रणजी ट्रॉफी सेमीफायनलची लढत; बंगालसमोर कर्नाटकचे आव्हान, सौराष्ट्र-गुजरात आमने-सामने
रणजी ट्रॉफी 2019-20 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. 4 सर्वोत्तम संघात आजपासून सेमीफायनल सामना रंगणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर गुजरात, सौराष्ट्र, बंगाल आणि कर्नाटक संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. दोन्ही सेमीफायनल सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळविण्यात येणार आहेत.
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2019-20 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. 4 सर्वोत्तम संघात आजपासून सेमीफायनल सामना रंगणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर गुजरात (Gujarat), सौराष्ट्र (Saurashtra), बंगाल (Bengal) आणि कर्नाटक (Karnataka) संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. दोन्ही सेमीफायनल सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळविण्यात येणार असून ते आजपासून, 29 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत खेळले जातील. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सौराष्ट्र आणि गुजरातमधील पहिला उपांत्य सामना, तर दुसरा उपांत्य सामना बंगाल आणि कर्नाटक यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजले आहेत.
शनिवारी येथे खेळल्या जाणार्या उपांत्य सामन्यात बंगाललाअंतिम सामन्यात 13 वर्षांनंतर प्रवेशमिळवण्यासाठी कर्नाटक आव्हानावर मात करावी लागेल. भारतीय सलामी फलंदाज केएल राहुल आणि मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेच्या पुनरागमनानंतर कर्नाटक संघ मजबूत झाला आहे. 1989-90 च्या मोसमात बंगाल संघ अखेर रणजी चॅम्पियन बनला होता, जो माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा प्रथम श्रेणीतील पदार्पणचा हंगाम होता. 2006-07 मध्ये दीप दासगुप्ताच्या नेतृत्वात संघाने अखेरीस अंतिम फेरी गाठली होती.
दुसरीकडे, जेव्हा सौराष्ट्र आणि गुजरात आमने-सामने तेव्हा त्यांच्या गोलंदाजांच्या सपाट विकेटवर कठीण परीक्षेला सामोरे जावे लागेल. गुजरात यंदाच्या स्पर्धेत एक मजबूत संघ समोर आला आहे ज्याने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. शिवाय, मागील उपविजेता सौराष्ट्र त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेऊ पाहत असेल. दरम्यान, निर्णयाचा आढावा प्रणाली म्हणजेच डीआरएसचा उपयोग रणजी च्या उपांत्य फेरीच्या आणि अंतिम सामन्यात केला जाणार आहे. भारताच्या प्रीमियर फर्स्ट प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डीआरएसचा पहिल्यांदा वापर केला जाणार आहे. मात्र, यामध्ये स्नीको मीटरचा समावेश नसल्यामुळे हे बरेच मर्यादित डीआरएस असेल. यामध्ये हॉट-स्पॉट आणि बॉल ट्रॅकर तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार नाही.