Ramiz Raja यांचे PCB अध्यक्षपद धोक्यात; हकालपट्टीची शक्यता, यांना मिळू शकेत संधी
यानंतर पाकिस्तानी संघावर सर्वत्र टीका होत आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे बदल होऊ शकतात.
PCB Chairman Ramiz Raja: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) दररोज कोणत्या ना कोणत्या वादाला तोंड फुटते. खेळाडूंच्या निवडीबाबतचा गोंधळ असो किंवा दिग्गज खेळाडूंचे आरोप, पाकिस्तान क्रिकेटमध्ये या बाबी सर्रास घडतात. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर पाकिस्तानी संघावर सर्वत्र टीका होत आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे बदल होऊ शकतात. रमीज राजा (Ramiz Raja) यांना अध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागू शकते. आता त्यांच्या जागी नजम सेठी (Nazam Sethi) यांना पीसीबीचे नवे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊया.
रमीज राजा यांचे पीसीबी अध्यक्षपद धोक्यात
माजी बोर्ड सदस्यांच्या नेतृत्वाखालील गटाने रमीझ राजा यांची पीसीबी अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मोहीम सुरू केली असल्याची अटकळ पसरली आहे. पडद्यामागे काहीतरी सुरू असल्याचा दावा या गटाने केला आहे. पीसीबीमधील बदलांसाठी देशाच्या कायदा मंत्रालयाने बोर्डाचे संरक्षक पंतप्रधानांची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “होय, काहीतरी चालू आहे. नजम सेठी यांनी अलीकडेच लाहोरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधानांची भेट घेतल्याच्या अफवा पसरल्या आहेत. अशा स्थितीत रमीझ यांना पदावरून हटवले जाऊ शकते. रमीझ राजा हे सप्टेंबर 2021 पासून पीसीबीचे अध्यक्ष आहेत आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांची नियुक्ती केली होती. (हे देखील वाचा: Ramiz Raja on BCCI: पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयवर केले पुन्हा धक्कादायक विधान, म्हणाले...)
नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा दिला होता राजीनामा
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाने बहुमत मिळविले तेव्हा नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि 1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य, रमीझ राजा यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी PCB चे 36 वे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. 2018 मध्ये इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर सेठी यांनी इम्रान खान सोबतच्या खराब संबंधांमुळे त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. सेठी यांनी 2013 आणि 2014 मध्ये पीसीबीचे अध्यक्षपदही भूषवले होते.