Jaydev Unadkat Gets Married: भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनादकट लग्नबंधनात अडकला; येथे पाहा लग्नाचा पहिला फोटो
त्याने गर्लफ्रेन्ड रिनी कंतारियासोबत (Rinny Kantaria) मंगळवारी लग्न केले आहे. गुजरातच्या (Gujarat) आनंद शहरातील (Anand) मधुबन रिसोर्टमध्ये (Madhuban Resort) त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.
भारतीय क्रिकेटर जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) लग्नबंधनात अडकला आहे. त्याने गर्लफ्रेन्ड रिनी कंतारियासोबत (Rinny Kantaria) मंगळवारी लग्न केले आहे. गुजरातच्या (Gujarat) आनंद शहरातील (Anand) मधुबन रिसोर्टमध्ये (Madhuban Resort) त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. केवळ जवळच्या लोकांनाच त्यांच्या लग्नात आमंत्रित करण्यात आले आहे. केवळ त्यानंतर उनादकट आणि रिनी या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर अनेक खेळाडूंसह त्याच्या चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
उनादकट याची पत्नी रिनी वकील आहे. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी गेल्या वर्षी 15 मार्चला साखरपुडा केला होता. परंतु, त्यांच्या लग्नाची तारिख गुपीत ठेवण्यात आली होती. जयदेव सतत रिनीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे आपण पाहिले आहे. लग्न सोहळ्याच्याआधी सोमवारी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील काही फोटो त्याच्या मित्राने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे देखील वाचा- IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्टसाठी काऊंटडाऊन सुरु, टीम इंडियाच्या ‘या’ 5 धडाकेबाज खेळाडूंवर लागून असेल सर्वांचे लक्ष
ट्विट-
जयदेव उनादकटला भारतीय क्रिकेट संघासाठी जास्त काळ खेळता आले नाही. परंतु, आयपीएलमध्ये त्याने केलेल्या कामगिरीची जोरदार चर्चा आहे. उनादकट याने अंडर-19 विश्वचषक 2010 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत क्रिडाविश्वावर वेगळी छाप सोडली होती. सध्या तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलच्या संघाकडून खेळत असून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी अधिक मेहनत घेताना दिसत आहे.