‘2025 मध्ये कोण बनेल जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर’? राजस्थान रॉयल्सच्या ‘त्या’ प्रश्नावर अष्टपैलू रवींद्र जडेजाची गमतीशीर रिअक्शन
यात आयपीएलच्या फ्रेंचायझीने हा प्रश्न विचारला की, ‘2025 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू कोण असेल’? या प्रश्नाच्या उत्तरात जडेजाने एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टवर गमतीशीर रिअक्शन देत जडेजाने स्वत:चे नाव घेतले
भारतीय संघाचा (Indian Team) स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसनाचा कार्यक्रमही त्याने सुरू केला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दुखापतीमुळे 12 मार्च, शुक्रवारपासून होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी देखील त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलेआहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केल्यावर जडेजा बुधवारी चर्चेत आला. यात आयपीएल (IPL) फ्रेंचायझीने हा प्रश्न विचारला की, ‘2025 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू कोण असेल’? या प्रश्नाच्या उत्तरात जडेजाने एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टवर गमतीशीर रिअक्शन देत जडेजाने स्वत:चे नाव घेतले आणि दुसर्या कोणत्याही क्रिकेटपटूचे नाव न घेता तो 2025 मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू होईल असे म्हटले. (Ravindra Jadeja इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता)
जडेजाच्या या टिप्पणीनंतर राजस्थान रॉयल्सने जडेजाच्या टिप्पणीवर लिहिले की, 'चर्चा येथेच संपते.'दरम्यान, जडेजाने अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामना खेळला ज्यानंतर त्याला अखेरच्या टेस्ट सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले होते. शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला गेला होता, ज्याने भारताने 2-1 अशा फरकावे विजय मिळवत मालिका खिशात घातली. सिडनी कसोटी अनिर्णीत राहिली ज्यात जडेजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जडेजाने चार गडी बाद केले तर फलंदाजी दरम्यान नाबाद 28 धावा केल्या. यापूर्वी आज जडेजाने स्वत:चा एक व्हिडिओही पोस्ट केला जिथे तो नेट्समध्ये घाम गाळताना दिसला.
जडेजाच्या भारतीय संघासाठी कामगिरीबद्दल बोलायचे तर घातक अष्टपैलूने संघाच्या अनेक विजयांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण 51 कसोटी सामने खेळले असून 220 विकेट घेतल्या आहेत तर 36.2 च्या सरासरीने 1954 धावा देखील केल्या आहेत. यंदाही 1 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने 168 सामन्यांमध्ये एकूण 2411 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय, त्याने 188 विकेट देखील आहेत. तसेच, त्याने आतापर्यंत एकूण 50 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 217 धावा आणि 44 गडी बाद केले आहेत.