IND vs AUS Test Series 2023: आर अश्विन कसोटीतील 'हा' अनोखा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ, अनिल कुंबळेला मागे टाकून रचणार इतिहास
नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे, तेव्हा तो टीम इंडियाचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा (Anil Kumble) कसोटी क्रिकेटमधील अनोखा विक्रम मोडून इतिहास रचणार आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा सामना नागपुरात (Nagpur) भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता खेळवला जाईल. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) कसोटीत ऐतिहासिक विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे, तेव्हा तो टीम इंडियाचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा (Anil Kumble) कसोटी क्रिकेटमधील अनोखा विक्रम मोडून इतिहास रचणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 बळी घेतल्यास तो अनिल कुंबळेचा विक्रम मोडेल.
अनिल कुंबळेचा हा अनोखा विक्रम मोडण्यासाठी सर्वात मोठा गोलंदाज तळमळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 449 बळी घेणारा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक विकेट घेतल्यास अनिल कुंबळेला मागे टाकून इतिहास रचणार आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series: खेळाडूंच्या दुखापतीमुळे रोहित शर्माची वाढली डोकेदुखी, जाणून घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते)
अनिल कुंबळेला मागे टाकून आर अश्विन रचणार इतिहास
आर अश्विनने नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 विकेट घेतल्याच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 विकेट घेणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज बनेल. अनिल कुंबळेने 93 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. आर अश्विनच्या नावावर 88 कसोटी सामन्यांमध्ये 449 विकेट आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 450 विकेट घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 80 कसोटीत
अनिल कुंबळे (टीम इंडिया) - 93 कसोटी सामन्यांमध्ये
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 100 कसोटींमध्ये
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 101 कसोटीत
नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 112 कसोटीत
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 800 कसोटी विकेट्स
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 708 कसोटी विकेट्स
जेम्स अँडरसन (इंग्लंड) - 675 कसोटी विकेट्स
अनिल कुंबळे (टीम इंडिया) - 619 कसोटी विकेट्स
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 566 कसोटी विकेट्स
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 563 कसोटी विकेट्स
कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - 519 कसोटी विकेट्स
नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 460 कसोटी विकेट्स
आर अश्विन (टीम इंडिया) - 449 कसोटी विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
अनिल कुंबळे - 619 कसोटी विकेट्स
आर अश्विन - ४४९ कसोटी विकेट्स
कपिल देव - 434 कसोटी विकेट्स
हरभजन सिंग - 417 कसोटी विकेट्स
इशांत शर्मा/झहीर खान - 311 कसोटी विकेट्स