CSK vs PBKS, IPL 2025 49th Toss Update: पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, चेन्नई करणार प्रथम फलंदाजी

चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

CSK vs PBKS, IPL 2025 49th Toss Update: पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, चेन्नई करणार प्रथम फलंदाजी
PBKS vs CSK (Photo Credit- X)

CSK vs PBKS 49th Match: आयपीएल 2025 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) आमनेसामने येणार आहेत. हा सामना चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जॅनसेन, अजमतुल्ला ओमरझाई, सूर्यांश शेडगे, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2025 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).