Khel Ratna Award 2019: हरभंजन सिंह याच्या मागणी नंतर पंजाब सरकारने दिले चौकशीचे आदेश, क्रीडा विभाग लागला कामाला
भज्जी यांच्या विनंतीची दाखल घेत पंजाब सरकारने चौकशीचे आदेश दिले आहे. "या प्रकरणात मी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय क्रिडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी खेळाडूंची यादी तयार करण्यात येत आहे. यात क्रिकेटआपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) खेल रत्न (Khel Ratna) पुरस्काराच्या शर्यतीत होते. मात्र, क्रिडा मंत्रालयाने यांचे नावे यादीत सामाविष्ट करुन घेतली नसल्याचे समोर आले आहे. भज्जीचे नाव पंजाब (Punjab) सरकारच्या वतीने पाठवण्यात आले होते. पण खेळाडूंचे नाव जमा करण्याची मुदत संपल्यावर भज्जी यांचे नाव देण्यात आल्याचे त्यांचे नाव या यादीत समाविष्ट केले गेले नाही. आणि पंजाब सरकारच्या या गैरजबाबदारीमुले हरभजन यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हरभजन यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात ते म्हणतात की, 20 मार्च रोजी सर्व कागदपत्रांसह त्यांनी आपला अर्ज पंजाब सरकारला पाठविला होता. अर्ज पाठविण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. शिवाय त्यांनी पंजाब सरकारने अर्ज पाठविण्यास कुठे उशीर झाला आहे याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. (द्युती चंदला अर्जुन पुरस्कार नाहीच, हरभजन सिंहचा 'खेल रत्न'चा अर्ज नकारला)
दरम्यान, भज्जी यांच्या विनंतीची दाखल घेत पंजाब सरकारने चौकशीचे आदेश दिले आहे. "या प्रकरणात मी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संचालक (क्रीडा) यांना चौकशी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे," पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमित सिंह सोधी (Rana Gurmit Singh Sodhi) यांनी सांगितले. दुसरीकडे, हरभजन यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाले की, यावेळी त्यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती पण त्यांचा अर्ज नाकारण्यात आल्याने ते निराश झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार असे म्हटले जात आहे की हरभजन यांचे नाव पंजाब सरकारने 25 जून रोजी पाठवले होते, तर हे नाव पाठविण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल होती. त्यांनी नाव पाठविण्यास उशीर केला. दुसरीकडे, हरभजन सह धावपटू द्युती चंद हिला देखील यंदा अर्जुन पुरस्कार मिळणार नाही. चंद हिची शिफारसही मुदत संपल्यानंतर केली होती. त्यामुळे द्युतीला देखील यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत स्थान मिळालेले नाही.