PBKS vs RCB, Qualifier 1 Live Scorecard: सुयश-हेझलवूड-यश यांच्या घातक गोलंदाजीमुळे पंजाब गारद, आरसीबीला विजयासाठी मिळाले 102 धावांचे लक्ष्य
आजचा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याच वेळी, पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. दरम्यान, बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने आरसीबीसमोर 102 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
RCB vs PBKS, IPL 2025 Qualifier 1: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा पहिला क्वालिफायर सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याच वेळी, पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. दरम्यान, बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने आरसीबीसमोर 102 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Qualifier 1. WICKET! 14.1: Azmatullah Omarzai 18(12) ct Jitesh Sharma b Josh Hazlewood, Punjab Kings 101 all out https://t.co/FhocIrg42l #QF1 #PBKSvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
पंजाब 101 धावांवर गारद
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात निराशाजनक झाली आणि अर्धा संघ अवघ्या 50 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाब किंग्जने षटकांत दहा गडी गमावून 101 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून मार्कस स्टोइनिसने नाबाद 26 धावांची सर्वाधिक खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 17 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. मार्कस स्टोइनिस व्यतिरिक्त, प्रभसिमरन सिंग आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनी 18-18 धावा केल्या.
सुयश शर्माची घातक गोलंदाजी
दुसरीकडे, यश दयालने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिले मोठे यश मिळवून दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा व्यतिरिक्त यश दयालने दोन विकेट्स घेतल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकांत 102 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकून आयपीएलच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

