PSL 2021 दरम्यान अनेकदा झाले बायो बबलचे उल्लंघन, सुरक्षेमध्येही तडजोड; PCB च्या अहवालात मोठा खुलासा

या दरम्यान, की फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेदरम्यान कराचीमध्ये कराचीमध्ये बायो-बबलचे अनेकदा उल्लंघन झाले असल्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) स्वतंत्र तथ्य-शोध समितीने पुष्टी केली आहे.

अधिकृत पीएसएल लोगो (@thePSLt20/Twitter)

PSL 2021: मार्च महिन्यात COVID-19 ची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर पाकिस्तान सुपर लीगची (Pakistan Super League) 2021 आवृत्ती पुढे ढकलली गेली. या दरम्यान, की फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेदरम्यान कराचीमध्ये बायो-बबलचे अनेकदा उल्लंघन झाले असल्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) स्वतंत्र तथ्य-शोध समितीने पुष्टी केली आहे. तत्पूर्वी, आयोजकांनी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियम आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम येथे ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. परंतु कोरोनाव्हायरससाठी बर्‍याच स्थानिक खेळाडू, परदेशी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या सदस्य कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे आढळून आले. ज्यामुळे पीसीबीला (PCB) अनिश्चित काळासाठी स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले. PTI नुसार समोर आले की अनेकदा जैव-बबलचे उल्लंघन झाले आहे आणि एक खेळाडू किंवा संघ मालक जबाबदार नाही. (PSL 2021: पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडू COVID-19 पॉसिटीव्ह, स्पर्धा अनिश्चित वेळेसाठी स्थगित)

डॉ. सय्यद फैसल महमूद आणि डॉ. सलमा मुहम्मद अब्बास यांच्या समितीने अंतिम अहवाल पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांना 31 मार्च रोजी सादर केला. पीसीबी आता निकालावर येण्यापूर्वी अहवालाचा अभ्यास करणार आहे. पीएसएल 2021 साठी 34 सामने नियोजित होते, परंतु आतापर्यंत 10 सामनेच खेळले गेले आहे. जैव-सुरक्षित बबलमध्ये असतानाही फवाद अहमद, टॉम बंटन, लुईस ग्रेगरी आणि काही स्थानिक खेळाडू व अधिकाऱ्यांसह अनेक खेळाडूं कोविड-19 पॉसिटीव्ह आढळल्याने पीसीबीला अचानक पीएसएल 6 पुढे ढकलणे भाग पडले. भागधारक पीसीबी अधिकाऱ्यांकडे उल्लंघनांची प्रकरणे घेऊन आले होते, परंतु योग्य पावले उचलली गेली नसल्याचं देखील अहवालात म्हण्टलं आहे. शिवाय, पीसीबी पीएसएलचे उर्वरित सामने 2 जून ते 20 जून या कालावधीत आयोजित करण्याचा विचार करीत आहेत. पीसीबीने डबल-हेडर आयोजित करण्याची योजनाही तयार केली असल्याचं म्हण्टलं जात आहे. कोविड-19 संबंधित प्रकरणांमुळे मार्चमध्ये अवघ्या दहा सामन्यांनंतर पीएसएल 6 पुढे ढकलण्यात आले.

पीसीबीचे वैद्यकीय व क्रीडा विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सोहेल सलीम यांनी यापूर्वीच आपला राजीनामा मंडळाकडे सादर केला आहे. पीएसएल 2021 दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांनी भागधारकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची पुष्टी पीसीबीने केली.