टीम इंडियामधील योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून एमएस धोनी चे कौतुक, म्हणाले- धोनीने रांचीला क्रिकेट विश्वात प्रसिद्ध केले

रांची विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास संबोधित करताना धोनीबरोबर झालेल्या भेटीचा संदर्भ देताना राष्ट्रपती म्हणाले की, 'धोनी लो प्रोफाइलमध्ये राहत असला तरी लोकं प्रतिभेमुळेच त्याच्यावर प्रेम करतात.

(Photo Credit: Twitter)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी सोमवारी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि नेमबाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) चे कौतुक केले. रांची विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास संबोधित करताना श्री. कोविंद म्हणाले की, धोनी आणि दीपिका कुमारी यांचा मला अभिमान आहे. रांचीहून आलेला धोनी हा एकमेव क्रिकेट खेळाडू आहे जो जागतिक क्रिकेटमध्ये नावलौकीस आला आहे. एका छोट्या शहरातून आलेला धोनी आज क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक आणि 2011 मध्ये आयसीसी क्रिकेट वनडे विश्वचषक जिंकला होता. मागील वर्षी राष्ट्रपती कोविंदकडून धोनीने पद्मभूषण पुरस्कार स्वीकारला होता. हा मान मिळवण्यासाठी आलेल्या धोनीने लेफ्टनंट कर्नलचा ड्रेस परिधान केला होता. (MS Dhoni च्या पत्नीची झारखंड मधील भाजपा सरकारवर झोड, लोडशेडिंग च्या दाव्यावरून व्यक्त केली नाराजी)

धोनीबरोबर झालेल्या भेटीचा संदर्भ देताना राष्ट्रपती म्हणाले की, 'धोनी लो प्रोफाइलमध्ये राहत असला तरी लोकं प्रतिभेमुळेच त्याच्यावर प्रेम करतात. धोनीने आपल्या कौशल्याच्या जोरावर झारखंडला देश आणि जगामध्ये अभिमान वाटला आहे.'टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर-फलंदाज धोनी विश्वचषकनंतर सध्या विश्रांतीवर आहे. विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये पराभवनानंतर धोनीने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेतून माघार घेतली. रविवारी धोनी आपल्या परिवारासह राजभवनात पोहोचला, तेथे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दुसरीकडे, राष्ट्रपती सध्या तीन दिवसांच्या रांची दौऱ्यावर आहेत. म्हणून माही आपली पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासमवेत राजभवनात पोहोचला. आणि सर्वांनी राजभवनातच साधे शाकाहारी जेवण केले.

या कार्यक्रमादरम्यान, कोविंद यांनी रांची विद्यापीठाच्या मुलींचेदेखील कौतुक केले. राष्ट्रपतींनी 47 मुलींना सुवर्ण पदक प्रदान केले. यावेळी ते म्हणाले की, 'मुली पुढे जात आहेत ही अभिमानाची बाब आहे. खूप शिकत आहे. मुलींच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या सुवर्ण भविष्याची झलक पाहायला मिळते.'