MS Dhoni च्या पत्नीची झारखंड मधील भाजपा सरकारवर झोड, लोडशेडिंग च्या दाव्यावरून व्यक्त केली नाराजी
तिने एका ट्विटच्या मार्फत झारखंड मधील भाजपा सरकारवर झोड घेतल्याचे समोर येत आहे. झालं असं की, येत्या काही दिवसात झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, याच पार्श्वभूमीवर सध्या कार्यरत असणाऱ्या झारखंड सरकारने आपल्या राज्यातील प्रगतीचे दाखले देणारे अनेक दावे करायला सुरुवात केली होती, याच अंतर्गत झारखंड मध्ये झिरो लोडशेडिंग असल्याचे देखील सांगण्यात आले होते
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) ही मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. अशातच आता तिने एका ट्विटच्या मार्फत झारखंड मधील भाजपा सरकारवर झोड घेतल्याचे समोर येत आहे. झालं असं की, येत्या काही दिवसात झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, याच पार्श्वभूमीवर सध्या कार्यरत असणाऱ्या झारखंड सरकारने आपल्या राज्यातील प्रगतीचे दाखले देणारे अनेक दावे करायला सुरुवात केली होती, याच अंतर्गत झारखंड मध्ये झिरो लोडशेडिंग असल्याचे देखील सांगण्यात आले होते, मात्र यावर साक्षी धोनी हिने खास टिपण्णी करत हा दावा पूर्णतः फोल असल्याचे सांगितले.
साक्षीचे असे म्हणणे आहे की, रांची (Ranchi) मध्ये दर दिवसा 4 तास लोडशेडिंग होते. ही वेळ कधी कधी 4 ते 6 तासापर्यंत देखील जाते. आणि मुळात जेव्हा हे लोडशेडिंग करतात तेव्हा सण किंवा पावसामुळे हे वीजकपात करावी असे काही कारणही नसते. असे असताना असा प्रकार करणे हा खूपच संतापजनक आहे.
#ranchi pic.twitter.com/OgzMHoU9OK
— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) September 19, 2019
मुख्यमंत्री रघूबार दास यांनी याबाबत अहवाल सादर करुन लवकरात लवकर येथील वीजप्रवाह सुरळीत करावा असे आदेश दिले आहेत. रांची शहर लोडशेडिंग मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील त्याला थोडा विलंब झाला आहे असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2019 03:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

