ICC World Cup 2019: Team India च्या ऑरेंज जर्सी वरून राजकारण, 'नरेंद्र मोदींचा देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न'; ICC ने केले विधान

दरम्यान, भारतीय संघाच्या जर्सीवरून देशभरात राजकारण सुरु आहे. ICC कडून मिळालेल्या माहितीनुसार, संघाच्या जर्सीचा रंग निवडण्याचा अधिकार हा बीसीसीआयकडे होता.

Images of SP, Congress flags and Team India's Orange jersey (Photo Credits: PTI/ANI)

विराट कोहली (Virat Kohli) चा भारतीय संघ सध्या विश्वकप मधील आपल्या कामगिरी बद्दल चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय संघ हा अपराजित संघ आहे. टीम इंडिया ने आत्तापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडिया आपल्या खेळ बरोबर दुसऱ्या कारणासाठी ही चर्चेचा विषय बनली आहे. आगामी होणाऱ्या इंग्लंड (England) विरुद्ध सामन्यासाठी भारतीय क्रिकेट टीम ऑरेंज रंगाची जर्सी घालणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या जर्सीवरून देशभरात राजकारण सुरु आहे. (ICC World Cup 2019 मध्ये रविवारी होणाऱ्या सामन्यात संपूर्ण पाकिस्तान करणार 'टीम इंडिया'साठी प्रार्थना; हे आहे कारण)

समाजवादी पार्टी (Samajwadi Party) चे अबू आजमी (Abu Azmi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न गंभीर आरोप केल आहेत. आझमी यांनी, "वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग हा पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यामुळे बदलला आहे. मोदी हे देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत" असा आरोप केला आहे.

ICC कडून मिळालेल्या माहितीनुसार, संघाच्या जर्सीचा रंग निवडण्याचा अधिकार हा बीसीसीआय (BCCI) कडे होता. त्यांना जो रंग योग्य वाटला त्यांनी तो दिला. भारतामध्ये ही भगव्या रंगाची जर्सी तयार करण्यात आली आहे. मात्र, संघाचे बॉलिंग कोणाचं भरत अरुण (Bharat Arun) यांनी सांगितले की टीम चे लक्ष जर्सीवर नाही आहे. अरुण म्हणाले, "आम्ही कोणते रंग परिधान करणार आहोत, यावर आम्हाला कोणतीही कल्पना नाही आणि आमचा सर्व लक्ष केवळ उद्याच्या सामन्यात आहे. आम्ही गेमवर लक्ष केंद्रित करीत आहोत आणि आम्हाला मिळालेल्या रंगाची जाणीव नाही आहे. आमच्या जर्सीचा मुख्य रंग निळाच असणार आहे.'

आयसीसीच्या नियमानुसार दोन संघ एकाच रंगाची जर्सी सामन्यात उतरू शकत नाही. म्हणून एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे. इंग्लंडविरुद्ध भारत आणि अफगाणिस्तान (Afghanistan) ला जर्सीचा रंग बदलावा लागेल. इंग्लंडला यजमान असल्याकारणामुळे त्यांना त्यांना आहे त्या जर्सीत खेळता येणार आहे.