PBKS vs KKR, IPL 2021: पंजाब किंग्ज आज कोलकाता नाईट राईडर्सशी भिडणार; कोणता संघ आहे वरचढ? येथे पाहा संपूर्ण आकडेवारी
या हंगामात दोन्ही संघाने आतापर्यंत निराजनक कामगिरी करून दाखवली आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 2021) 21व्या सामन्यात पंजाब किंग्सचा संघ कोलकाता नाईट राईडर्सशी (Panjab Kings Vs Kolkata Knight Riders) भिडणार आहे. या हंगामात दोन्ही संघाने आतापर्यंत निराजनक कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब 4 गुणांसह पाचव्या तर, कोलकाता 2 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यापैकी 2 सामन्यात त्यांना विजय मिळला आहे. तर, 3 सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. दुसरीकडे कोलकाताच्या संघाला 5 पैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.
पंजाब आणि यांच्यात आतापर्यंत एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. ज्यात कोलकाताच्या संघाने 18 सामन्यात पंजाबला धुळ चारली आहे. तर, 9 सामन्यात पंजाबला कोलकातावर विजय मिळवता आला आहे. या आकडेवारीनुसार, कोलकाताचा संघ वरचढ ठरला आहे. परंतु, पंजाबने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. तर, कोलकाताच्या संघाला चेन्नई सुपर किंग्जने पराभूत केले आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएल मधून खेळाडूंची कोरोनामुळे माघार, रविचंद्रन अश्विन नंतर 'हे' क्रिकेटपटू सामन्यांमधून पडले बाहेर
आयपीलच्या मागील हंगामात दोन्ही संघाने एक-एक सामना जिंकला होता. कोलकाताच्या आंद्रे रसलने पंजाब विरुद्ध सर्वाधिक 251 धावा ठोकल्या आहेत. तर, पंजाबचा कर्णधार के. एल राहुल यानेही कोलकाता विरुद्ध 231 धावा केल्या आहेत. यामुळे आजच्या सामन्यात आंद्रे रसल आणि के.एल राहुलच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, कोलकाताच्या संघाकडून सुनिल नारायणने पंजाब विरुद्ध सर्वाधिक 28 विकेट्स घेतले आहेत. तर, पंजाबकडून मोहम्मद शामीने कोलकाता विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली आहे.