PBKS vs DC, IPL 2023 Match 64: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज होणार लढत, सर्वांच्या नजरा असतील या बलाढ्य खेळाडूंवर

दोन्ही संघांमधील या मोसमातील ही दुसरी लढत असेल. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे.

PBKS (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 64 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात होणार आहे. पंजाबचे होम ग्राऊंड असलेल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Himachal Pradesh Cricket Association Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील या मोसमातील ही दुसरी लढत असेल. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे. पंजाब किंग्जसाठी हा करा किंवा मरोचा सामना असेल. या सामन्याद्वारे दोन्ही संघ आपापल्या 13व्या सामन्यात खेळतील. पंजाब किंग्जने आतापर्यंत 6 आणि दिल्ली कॅपिटल्सने 4 सामने जिंकले आहेत. (हे देखील वाचा: PBKS vs DC Head To Head: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आज होणार लढत, जाणून घ्या कोणता संघ आहे वरचढ)

सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील

प्रभसिमरन सिंग

युवा यष्टिरक्षक-ओपनर प्रभसिमरन सिंगने गेल्या सामन्यात आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. प्रभसिमरन सिंगने 65 चेंडूत 103 धावांची शानदार खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. या सामन्यातही प्रभसिमरन सिंग पॉवरप्लेमध्ये वेगवान धावा करू शकतो.

डेव्हिड वॉर्नर

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या संघासाठी 52 धावांची खेळी करत संघाला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. डेव्हिड वॉर्नर दिल्ली संघाकडून आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या सामन्यातही संघाला डेव्हिड वॉर्नरकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.

मिचेल मार्श

मिचेल मार्शने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत. मिचेल मार्शला फलंदाजीत काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याचा फटका संघाला सहन करावा लागत असून, या सामन्यात संघाला यापेक्षा मोठी धावसंख्या हवी आहे.

अक्षर पटेल

तो दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा आहे. अक्षर पटेलने या स्पर्धेत आतापर्यंत 268 धावा केल्या असून 10 बळी घेतले आहेत. या सामन्यातही अक्षर पटेलकडून संघाला मोठ्या आशा आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करण, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रोव्हमन पॉवेल/अ‍ॅन्रिक नॉर्टजे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार, मनीष पांडे.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप