Parthiv Patel Announces Retirement: पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, 17व्या वर्षी डेब्यू करत कसोटीतील बनला सर्वात युवा विकेटकीपर

17 वर्ष 153 दिवशी 2002मध्ये भारतीय संघात प्रवेश केला आणि कसोटीतील पदार्पण करणारा सर्वात युवा यष्टीरक्षक बनला. त्याच्या कारकीर्दीची सुरुवात चांगली झाली असताना, 2004 मध्ये दिनेश कार्तिक आणि महेंद्र सिंह धोनीच्या आगमनानंतर पटेलने आपले स्थान गमावले.

पार्थिव पटेल (Photo Credit: Twitter)

Parthiv Patel Announces Retirement: बुधवारी 18 वर्षांची कारकीर्द संपुष्टात आणत विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेलने (Parthiv Patel) सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती जाहीर केली. 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू (Parthiv Patel Debut) केलेल्या 35 वर्षीय पार्थिवने भारतासाठी 25 टेस्ट, 38 वनडे आणि काही टी-20 सामन्यात नेतृत्व केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव ने गुजरातसाठी 194 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये झळकला. 17 वर्ष 153 दिवशी 2002मध्ये भारतीय संघात प्रवेश केला आणि कसोटीतील पदार्पण करणारा सर्वात युवा यष्टीरक्षक (Youngest Wicketkeeper in Test) बनला. त्याच्या कारकीर्दीची सुरुवात चांगली झाली असताना, 2004 मध्ये दिनेश कार्तिक आणि महेंद्र सिंह धोनीच्या आगमनानंतर पटेलने आपले स्थान गमावले. जरी त्याने मधल्या काळात पुनरागमन केले तरी तो भारतीय संघात नियमित स्थान मिळविण्यास अपयशी ठरला आणि रिद्धिमान साहा कसोटीतील पहिल्या पसंतीचा विकेटकीपर म्हणून उदयास आल्यानंतर क्रिकेटरसाठी गोष्टी अधिक आव्हानात्मक बनल्या.

2003 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठीही त्याची भारतीय संघात निवडण्यात आले होते परंतु त्याला संधी मिळाली नाही कारण संघात अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाजांची भर घालण्यासाठी संघाने राहुल द्रविडचा यष्टिरक्षक म्हणून वापर केला. तथापि, पार्थिवने कधीही हार मानली नाही. इंडियन प्रीमियर लीग आणि घरगुती सर्किटमध्ये तो कायम कामगिरी करत राहिला. फेब्रुवारी 2016 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय  खेळल्याच्या चार वर्षानंतर, पार्थिव जखमी धोनीच्या जागी स्टॅन्ड-बाय म्हणून भारताच्या संघात परतला. 2016-17मध्ये गुजरातला पहिले रणजी विजेतेपद मिळवून देणाऱ्या पार्थिवने घरगुती सर्किटमध्ये धावांचा डोंगर उभारला. त्याने 194 प्रथम श्रेणी सामान्यत 11,240 धावा आणि 193 लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 5172 धावा केल्या. 2016-17 मध्ये रणजी करंडक स्पर्धेच्या विजेतेपदानंतर इंग्लंडविरुद्ध जखमी साहाच्या कसोटी संघात पटेलला सामील करण्यात आले होते. गुजरातच्या खेळाडूने सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर करत आपल्या 18 वर्षीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आणली.

आयपीएल 2020 मध्ये पार्थिव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल 2015 मध्ये त्याने 339 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सच्या विजयी मोहिमेत चौथ्या सर्वाधिक धावा केल्या. वर्षाच्या शेवटी, गुजरातकडून पहिले हजारे ट्रॉफी विजेतेपद पटकावण्याकरिता पहिले लिस्ट-ए-शतक झळकावले. पार्थिवच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत प्रज्ञान ओझाने लिहिले, "एक आश्चर्यकारक कारकीर्दबद्दल पीपी अभिनंदन. तुम्हाला शुभेच्छा!"