संदीप लामिछाने याने केले असे विधान कि पाकिस्तानी यूजर्सने केले मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज यांना ट्रोल, पाहा Tweets

यावर पाकिस्तानी यूजर्सने मोहम्मद अमीर आणि वहाब रियाजना या तरूण फिरकीपटूकडून शिकण्याचा सल्ला दिला.

संदीप लामिछाने (Photo Credit: IANS)

नेपाळ (Nepal) चा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) हळूहळू टी -20 फ्रँचायझी सर्किटमध्ये विश्व क्रिकेटचा स्टार बनत आहे. दिल्ली फ्रँचायझीसाठी 2018 च्या आयपीएलच्या (IPL) आवृत्तीत लामिछाने सर्वप्रथम ठसा उमटविला. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरिबियन प्रीमियर लीग, बांग्लादेश प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्येही झळकला. तथापि, टी -20 लीगमध्ये खेळण्याचा आनंद घेत असताना नेपाळकडून कसोटी क्रिकेट खेळणे त्याच्यासाठी अधिक समाधानकारक ठरेल, असे तो म्हणाला. पाकिस्तानचे पत्रकार साज सादिक यांनी लामीछानेचे म्हणणे उद्धृत केले की 'त्याला फ्रँचायझी क्रिकेट खेळायला आवडते पण हेदेखील कबूल केले की असे शेकडो खेळ खेळले गेले तरी नेपाळकडून एक कसोटी सामना खेळल्यामुळे त्याला मिळालेला वैयक्तिक समाधान कधीच मिळणार नाही.

खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या 19 वर्षीय खेळाडूच्या उत्कटतेविषयी जाणून घेतल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी स्टार लेगस्पिनर मोहम्मद अमीर (Mohammad Amir) आणि वहाब रियाज (Wahab Riaz) यांना या तरूण फिरकीपटूकडून शिकण्याचा सल्ला दिला. अमीरने यंदा विश्वचषकनंतर कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती, तर रियाजने सर्वाधिक प्रदीर्घ प्रारूपातून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. येथे पाहा पाकिस्तानी यूजर्सच्या काही प्रतिक्रिया:

कोणीतरी याचा उल्लेख अमीरला करायला हवा

पाकिस्तानी लोकांना ही गोष्ट कोणी समजावून सांगणार???

संदीपला देशासाठी कसोटी सामना खेळायचा आहे आणि आमचा राष्ट्रीय नायक अमीर आणि वहाब यांना फ्रँचायझी क्रिकेट खेळायचे आहे ...

आमच्या तथाकथित सुपरस्टार्सनी या लहान मुलाकडून हे शिकले पाहिजे

लामिच्छाने सहा वनडे आणि 18 टी-20 सामन्यांमध्ये नेपाळचे प्रतिनिधित्व केले आहे. नेपाळला अद्याप पूर्ण-वेळ कसोटीचा दर्जा मिळालेला नाही. फ्रेंचायझी क्रिकेटमध्येही या तरूणाने जबरदस्त प्रभाव पाडला आहे. 2018 पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या 19 वर्षीय खेळाडूला यंदाही फ्रँचायझीने कायम ठेवल्याचे समजले जात आहे. आयपीएल व्यतिरिक्त तो जगभरातील इतर फ्रँचायझीसाठीदेखील खेळतो. यामध्ये सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्स आणि बार्बाडोस ट्रायडेन्ट्स (कॅरिबियन प्रीमियर लीग), नांगरहार लेओपर्डस (अफगाणिस्तान प्रीमियर लीग), मेलबर्न स्टार्स (बिग बॅश लीग), सिलेहट सिक्सर्स (बांग्लादेश प्रीमियर लीग) आणि लाहौर कलैंडर्स (पाकिस्तान सुपर लीग) यांचा समावेश आहे.