PAK vs BAN 2nd T20I Match Toss Update: बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेशचा 37 धावांनी पराभव केला. यासह, पाकिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बागंलादेशला आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करायची आहे. तर पाकिस्तानला सामना जिंकून मालिका नावावर करायला आवडेल. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

PAK vs BAN 2nd T20I Match Toss Update: बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
Photo Credit- X

Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd T20I Match 2025: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा टी-20 सामना आज म्हणजेच 30 मे रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेशचा 37 धावांनी पराभव केला. यासह, पाकिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बागंलादेशला आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करायची आहे. तर पाकिस्तानला सामना जिंकून मालिका नावावर करायला आवडेल. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

पाकिस्तान: हसन नवाज, शादाब खान, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, हसन अली, हारिस रौफ, अबरार अहमद, सलमान अली आगा (कर्णधार), साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक).

बांगलादेश: लिटन दास (कर्णधार), तन्झिद हसन तमीम, तौहीद हृदयॉय, जाकेर अली अनिक (विकेटकीपर), शमीम हुसेन पटवारी, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).