Pakistan vs England 1st Test 2nd Day Live Streaming: इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्याचा पहिला दिवसा पाक फलंदाजांनी गाजवला, दुसऱ्या दिवशीच्या खेळाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? घ्या जाणून
हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पाकिस्तान संघाची कमान शान मसूदच्या हाती आहे. तर ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 2 nd Live Streaming: हा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबरपासून (सोमवार) मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर 328 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूदने 151 धावा केल्या आणि अब्दुल्ला शफीकनेही 102 धावांची शानदार खेळी केली. आता दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघ हा कमबॅक करतो की पाकिस्तानचा संघ हा सामन्यावर डॉमिनेट करतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. (हेही वाचा - PAK vs ENG 1st Test 2024 Day 1 Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानची चांगली सुरुवात, शान मसूद, अब्दुल्ला शफीकने झळकावली शतके, इंग्लंड विकेटच्या शोधात, पहा स्कोअरकार्ड )
पाहा पोस्ट -
सामन्याचे स्थान आणि वेळ
हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पाकिस्तान संघाची कमान शान मसूदच्या हाती आहे. तर ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून पहिल्या कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल.