Pakistan Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, अनुभवी फलंदाज संघात परतला; सॅम अयुब बाहेर

तथापि, 15 जणांच्या संघात सैम अयुबचा समावेश करण्यात आलेला नाही. फहीम अशरफ, खुशदिल शाह आणि सौद शकील हे देखील संघात परतले आहेत. पाकिस्तानचा संघ 19 फेब्रुवारी रोजी स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

Pakistan Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, अनुभवी फलंदाज संघात परतला; सॅम अयुब बाहेर
PAK Team (Photo Credit - X)

ICC Champions Trophy 2025: पाकिस्तानने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) आपला संघ (Pakistan Squad) जाहीर केला आहे. संघाची कमान मोहम्मद रिझवानकडे (Mohammad Rizwan) सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर फखर झमानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. कामरान गुलामलाही संघात स्थान देण्यात आले आहे. सलमान आगाला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तथापि, 15 जणांच्या संघात सैम अयुबचा समावेश करण्यात आलेला नाही. फहीम अशरफ, खुशदिल शाह आणि सौद शकील हे देखील संघात परतले आहेत. पाकिस्तानचा संघ 19 फेब्रुवारी रोजी स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानचा संघ

मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

हे देखील वाचा: ICC Champions Trophy 2025 All Squads: भारत, दक्षिण आफ्रिका ते न्यूझीलंड... आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व देशाचे संघ येथे पाहा

पाकिस्तानचे गट टप्प्यातील सामने -

19 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

23 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

27 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).